बेलाग सुळका.... कोथाळीगड
निसर्गाचा मनसोक्त आनंद घ्यायचा असेल आणि त्याची वेगवेगळी रूपे अनुभवायची असतील तर, मान्सून ट्रेक ला पर्याय नाही. आम्हा ट्रेकर्सना मान्सून ट्रेक म्हणजे पर्वणीच! खरं तर वर्षा ऋतुची सुरूवात अनुभवण्यासारखी असते. वातावरणातील बदल आणि सर्वत्र पसरत चाललेली हलकीशी हिरवळ मन प्रसन्न करते. नेहमी प्रमाणे फोना ग्रुपने या वर्षातला पहिला मान्सून ट्रेक 18 जून ला आयोजित केला. त्याप्रमाणे आमचा 40 जनांचा ग्रुप पुण्यातून सकाळी साडेसहा ला लोणावळा-खोपोली मार्गे कर्जत कडे रवाना झाला. साधारण पुणे ते कर्जत दोन तास लागतात. हा किल्ला रायगड जिल्ह्यात येत असुन उंची साधारण 3100 फुट आहे. हा किल्ला गिरी दुर्ग प्रकारात येत असुन भीमाशंकर डोंगर रांगेत आहे. कोथाळीगड हा कर्जत पासून 20 कि. मी. अंतरावर आहे. आम्ही कशेळे मार्गे अंबिवली या गावात उतरलो. ग्रुप लिडर मंदार सरांनी ट्रेक विषयी सुचना दिल्या व हर हर महादेव च्या गजरात अंबिवली गावातून ट्रेक ला सुरुवात केली. अंबिवली तून गडाकडे जाणारी वाट... आजिबात पाऊस नसल्याने ऊन आणि दमट हवे मुळे सर्वजण घामाघूम झाले. डिहाईडरेशन होऊ नये म्हणून लिंबू सरबत, पाणी, एनर्जी...