चिल्ड् डुंबा... देवकुंड धबधबा
कातळधरा चा थरार अनुभवल्या नंतर मी अगदी रोमांचित होऊन गेले होते. आता दोन महिने झाले पायाला कसली तंगडतोड नाही,अशा तंगडतोडीतून दुखणाऱ्या पायांची वेदना खुप छान हवी हवीशी वाटते. कित्येक दिवसात या सह्याद्री चे दर्शन झाले नाही की मनाला अगदी रुखरुख लागते. खुप वेड लावले या डोंगरवाटानी, सह्याद्रीच्या कुशीत का एकदा शिरले की याची ओढ वाढतच जाते. तरीही मनाला, पायाच्या भिंगरीला थोडी आवर घालावी लागते; काय करणार आपल्याला सगळंच करायचं असतं ना! घर जबाबदाऱ्या सण उत्सव इ. असो, माझ्यासाठी तर विक पॉईंट ठरतायत या डोंगरवाटा. ह्या सह्याद्रीत लपलेला अजुन एक सुंदर नजराणा , अनोख्या हिरव्या रंगात भासणारे अत्यंत नितळ, कुंडाच्या आकाराचे तळंच जणू असे हे 'देवकुंड', आणि या कुंडात तुफान कोसळणारा जिथे पावसाळ्यात जाण्याचा विचार पण करता येत नाही अशा प्लस व्हॅलीतून खाली येणारा रौद्रभिषण धबधबा.... म्हणजेच "देवकुंड धबधबा"!!!!!!!!!" Natural Water Bathtub of God" आणि त्यात डुंबण्याचा योग आलाच.... 5 नोव्हेंबर ला फोना ग्रुप ची बस आम्हा 33 वेड्याना गुंडाळून भिरा कडे निघाल...