मधुर अठवणींचा मधाळ ट्रेक... मधुमकरंद गड
मधु मकरंद गड नावा प्रमाणेच कसा मधाळ वाटतो ना! नावातच किती ओढ वाटते 'मधु मकरंद' गड. या वनदूर्गा ची वाट जावळी च्या घनगर्द आरण्यातून जाते. म्हणून मला हा ट्रेक करायचा होता. अशी ही जावळी.... जावळी म्हणजे वाघाची जाळी, येता जावळी जाता गोवळी... अशी ही मोऱ्यांची जावळी. जावळीचं खोरं जितकं आफ़ाट तितकंच अवघड व अभेद्य आहे. अशी ही अभेद्य जावळी प्रत्यक्षात ताब्यात घेण्याची कोणाची हिम्मत देखील होत नव्हती. असं हे जावळीचं अभेद्य खोरं शिवरायांनी मोऱ्यांचा बिमोड करुन स्वराज्यात आणलं आणि जावळी जिंकून स्वराज्य विस्तार केला. अशी ही जावळी लहान पणा पासून वाचनात आलेली,गोष्टीतून ऐकण्यात आलेली. तेव्हा पासून नेहमी वाटायचं एकदा तरी पहावी. आणि तो योग आलाच... या घनगर्द अरण्यातला वनदूर्ग पाहण्याची व निबिड जंगलातून वाटचाल करण्याची मनातील इच्छा.... "माऊंटन एज अॅडव्हेंचर पुणे"..... यांच्या मधु मकरंद ट्रेक मुळे पूर्ण झाली. माऊंटन एज अॅडव्हेंचर चा..... 84 वा ट्रेक 'मधु मकरंद गड'... 14 व 15 एप्रिल रोजी ठरला. त्याप्रमाणे 14 एप्रिल रोजी रात्री 11 :30 ला... निगडीतून एक बस व दु...