मधुर अठवणींचा मधाळ ट्रेक... मधुमकरंद गड
मधु मकरंद गड नावा प्रमाणेच कसा मधाळ वाटतो ना! नावातच किती ओढ वाटते 'मधु मकरंद' गड. या वनदूर्गा ची वाट जावळी च्या घनगर्द आरण्यातून जाते. म्हणून मला हा ट्रेक करायचा होता. अशी ही जावळी.... जावळी म्हणजे वाघाची जाळी, येता जावळी जाता गोवळी... अशी ही मोऱ्यांची जावळी. जावळीचं खोरं जितकं आफ़ाट तितकंच अवघड व अभेद्य आहे. अशी ही अभेद्य जावळी प्रत्यक्षात ताब्यात घेण्याची कोणाची हिम्मत देखील होत नव्हती. असं हे जावळीचं अभेद्य खोरं शिवरायांनी मोऱ्यांचा बिमोड करुन स्वराज्यात आणलं आणि जावळी जिंकून स्वराज्य विस्तार केला. अशी ही जावळी लहान पणा पासून वाचनात आलेली,गोष्टीतून ऐकण्यात आलेली. तेव्हा पासून नेहमी वाटायचं एकदा तरी पहावी. आणि तो योग आलाच... या घनगर्द अरण्यातला वनदूर्ग पाहण्याची व निबिड जंगलातून वाटचाल करण्याची मनातील इच्छा.... "माऊंटन एज अॅडव्हेंचर पुणे"..... यांच्या मधु मकरंद ट्रेक मुळे पूर्ण झाली.
माऊंटन एज अॅडव्हेंचर चा..... 84 वा ट्रेक 'मधु मकरंद गड'... 14 व 15 एप्रिल रोजी ठरला. त्याप्रमाणे 14 एप्रिल रोजी रात्री 11 :30 ला... निगडीतून एक बस व दुसरी तळेगांवातून अशा दोन बस चांदणी चौकातून बंगलोर हाय वे वरुन निघाल्या. पुढे एके ठिकाणी नारळ वाढवून प्रवास सुरू झाला.
यावेळेस मुलींची संख्या उल्लेखनीय होती. मधुमकरंद गडाची सर्व ट्रेकर्सना आतुरता आणि मला जावळीच्या जंगलाची... त्यामुळे बस मध्ये फारशी झोपही लागली नाहीच. बस वाई मार्गे पाचगणी महाबळेश्वर हातलोट येथे जाणार होती. पसरणी घाटातून बस जशी वर निघाली तशी थंड हवेचा पहाड महाबळेश्वर चढतोय याची जाणीव होऊ लागली. पहाटे साडेपाच वाजता 'जंगल व्हॅली रिसॉर्ट' चतुरबेट रोड येथे बस थांबल्या. बस मधेच लिडर ने फर्मान सोडले इथे सगळ्यांना तासात फ्रेश होऊन चहा नाश्त्यासाठी तयार रहायचे आहे आणि त्याप्रमाणे सगळ्यांची लगबग सुरू झाली. पहाट असल्याने आजून अंधार होता. बस मधून उतरल्या बरोबर अंगावरुन थंड हवेची झुळूक गेली... अहाहा!! किती अल्हादायक व्वा!.. पहाटेच्या कमालीच्या निस्तब्ध वातावरणात पाखराची एखादी शीळ हलकेच छेडून जात. रखरखत्या उन्हाळ्यात हवा हवासा वाटणारा थंडावा इथे कमालीचा जाणवत होता. फ्रेश होई पर्यंत हळूहळू उजाडत होतंच. आजूबाजूची हिरवीगार वनराई पाहून मना बरोबर नेत्र ही सुखावू लागले . दिवसाची इतकी सुंदर सुरुवात... अप्रतिम अशी निराळीच प्रसन्नता अनुभवत आम्ही नाश्ता व चहाचा मनमुराद अस्वाद घेतला.
इथून पाच कि. मी. वर असलेल्या कसरुड या गावी आलो. इथे ग्रुप लिडर मंदार सरांनी ट्रेक विषयी सर्व सुचना दिल्या व इथूनच या सुंदर गावातून सकाळी सात वाजता ट्रेक सुरू केला. सकाळचं कोवळी उन्ह आणि प्रसन्न वातावरणात सगळे उत्साही ट्रेकर्स आपापल्या ट्रेकिंग स्टाईल मध्ये कसे मस्त दिसत होते.
थोडावेळ चालल्यानंतर घनगर्द जंगलाची माझ्या आवडीची वाट सुरू झाली. . अशा आडवाटा मला नेहमीच आवडतात फक्त त्या तुडवायची झिंग असली की झालं, मग आमच्या सारख्या निसर्गप्रेमीनां अशा जंगलीवाटा आणि आडवाटा नेहमी खुणावतच राहतात,काय करणार...!आणि माझी ही झिंग तर या जंगलवाटा मुळे आणखी वाढतच चाललीय.
जंगल वाट
एप्रिल मध्येही हिरवेगार जंगल आणि चढणीच्या पायवाटेवर पडलेल्या पाचोळ्याचा खच त्यामुळे पाय चांगलेच सटकत होते .
या जंगलात रानडुक्करांचा वावरही जास्त आहे, त्यामुळे कोणीही ग्रुप सोडून मागेपुढे एकटे राहू नये, अशी वर्णीच दिलेली. कारण ते एकट्या दुकट्यावर हल्ला करतात.त्यामुळे कशाला कोण एकटं राहिल बाबा..! दुसरं असं की इथे वेगवेगळ्या सापांचा घरोबा आहेच. त्यामुळे चढण चढताना कितीही वाटलं तरी एखाद्या झाडांला सुध्दा धरायची सोय नाही , काय सांगावं कुठुन एखादा यायचा भस्सकन बाहेर! त्यांचा काही नेम नाही!
म्हणून आपली काळजी घेतलेली बरी.
वारं नसल्याने पानांची सळसळ नसली तरी पाखरांचे इतके वेगवेगळे मंजुळ आवाज कानावर येत होते की, कुठल्याही म्युझिक सिस्टीम सर येणार नाही. आवाजावरून काही पक्षी ओळखता येत नसले तरी कर्णमधुर नक्कीच!! असे हे पाखरांचे मंजुळ आवाज शहरातल्या कर्णकर्कश गोंगाटात विरुनच गेलेत आणि दर्शन तर दुर्मिळच झालय. जंगल भटकंतीत जर कोणी डिओ किंवा परफ्यूम मारला असेल आणि मधमाश्यानां तो लयीच आवडला तर त्याला त्यांच्याकडून मस्त पाहुणचार मिळणारच! कारण या जंगलात मधमाश्यांची खुप पोळी आहेत. त्यामुळे इथून भरपूर प्रमाणात मध मिळतो. कदाचित यामुळेही या वनदूर्गला मधुमकरंद म्हणत असावेत. आम्हाला या वाटेवर कळशी भरभरुन मध घेऊन जाणारे गावकरीही दिसले.
एके ठिकाणी मध काढताना गावकरी..
दोन तासाच्या भटकंती नंतर जिथे जंगल संपते तिथे एक प्रशस्त शिवमंदिर लागते. या मंदिरात वन्यप्राण्यापासून अगदी सुरक्षित राहता येते. फक्त कुठेही पाण्याची सोय नसल्याने ती आपली आपण करावी. इथून कोयना धरणाचा पसरलेला अथांग जलाशय व त्यापलीकडील वासोट्याचे जंगल नजरेत भरते.
शिवमंदिर...
ओहो काय योगायोग झाला... माझे ट्रेकगुरु माझे सासरे श्री. रामचंद्र पवार.. व त्यांचे तीन मित्र आदल्या दिवशीच इथे कॅम्पिंगला आले होते. त्यामुळे आमची अगदीच ट्रेकमय भेट झाली. या वयात देखिल ट्रेक चालू आहेत म्हणून सर्वांना त्यांचा खुप अभिमान वाटला. ग्रुप लिडर मंदार सर व राणे सरांनी त्यांची भेट घेतली व म्हणाले आम्हीही असेच ऐंशी वयापर्यंत लोकांना अनेक ट्रेक घडवू असे आशिर्वाद द्या.
माझे सासरे आणि मी
यानंतर आम्ही पुढे मधु गडावर जाण्यासाठी निघालो.
गडाची मुरबाड घसरडी वाट आणि वर मोकळं आकाश, त्यामुळे आता उन्हाची तीव्रताही वाढू लागली आणि घामाच्या धाराही. त्यासाठी प्रत्येकजन काही ना काही एनर्जी ड्रिंक, पाणी घेत होते. कमालीचा चढ आणि तितकाच उतार. त्यामुळे थोडी दमछाकही होत होती. गडाच्या निम्म्याहून कमी टप्प्यात आल्यावर थोडे थांबलो.
इथून गडाच्या सगळ्या बाजूने वेढलेल्या जावळीच्या घनगर्द जंगलाने थकल्या डोळ्यांनां जरा शांत केले.
गडाच्या मध्यावर दोन वाटा फुटतात एक डावीकडे तर दुसरी उजवीकडे दोन्ही बाजूंनी गडावर जाता येते. उजव्या बाजूने गेल्यास पांडवकालिन पाण्याचे टाके लागते पण हे पाणी सध्या तरी पिण्यालायक नाही.
टाक्याच्या डाव्याबाजूने गडावर जाण्यासाठी एक अवघड राॅकपॅच आहे. हा पार केला की आपण मधु गडावर पोहचतो. उन्हाळ्यामुळे गडावर अगदीच रखरखाट होता. किल्ला तसा बांधलेला दिसत नाही, तटबंदी कुठेही नाही पण माथ्यावर अजून एक शिवमंदिर आहे व त्यासमोर एकच मोठे झाड आहे. त्याच्याच सावलीत आम्ही 64 ट्रेकर्स विसावलो.
सगळ्यानी बरोबर आणलेला खाऊ एकमेकांना देत घेत व एकमेकांची मस्ती करत थोडावेळ तिथेच रेंगाळलो. मंदार सरांनी इथे ट्रेकिंग ग्रुप व गडाविषयी माहिती दिली. इथेच ग्रुप फोटोही घेतले.
"माऊंटन एज अॅडव्हेंचर पुणे "
जंगलातून परत येताना एके ठिकाणी झुडपावरुन एक हिरवागार साप 🐍 मस्त निघाला होता म्हणे त्याला पाहून बरेच जण पुढेही गेले होते. याची चाहूल लागताच आम्ही मागचे ट्रेकर्स त्याला पाहण्यासाठी पटपट पुढे आलो. ग्रुप मधिल आमचे सर्पमित्र संजय निकाळजे सरांनी त्या सापाविषयी संपूर्ण माहिती दिली ती अशी... हा हरणटोळ असुन निमविषारी आहे. याला चाबुकस्वार असेही म्हणतात. हा अंगाने बारीक असला तरी चिमणी सुध्दा खाऊ शकतो व खाल्ल्यानंतर दिड इंच फुगतो. रंगाने हिरवागार असुन त्याच्या अंगावर पिवळ्या रंगाचा रेडिअम चा पट्टा असतो तो ही दाखवला. या रेडिअम मुळे रात्री अंधारातही हा चमकतो हि माहिती माझ्यासाठी खुपच चकित करणारी होती. निकाळजे सरांनी अतापर्यंत विस हजार आठशे साप 🐍 पकडून व्यवस्थित जंगलात सोडून दिले आहेत. हा ही हरणटोळ चुकून पायवाटेवर येऊ नये म्हणून त्याला जरा आत जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडले. तरीही तो जाई पर्यंत आम्ही त्याच्या मोहक हालचाली टिपत होतो. हा माझ्यासाठीखुप छान अनुभव होता.
जंगलवाट संपवून परत आम्ही रिसॉर्ट व्हॅलीकडे आलो... तिथे जेवणावर यथेच्छ ताव मारुन, अर्धातास तिथेच आराम करुन परत पुण्याची वाट धरली. परतताना पार घाटात कोयना नदीवर हा शिवकालीन पूल लागतो. 350 वर्षे झाली तरी अजूनही सुस्थितीत व भक्कम पूल आहे, नाहीतर आताचे पूल उद्घाटनप्रसंगीच कोसळतात. यावरुन शिवाजी राजांची संपर्कप्रणाली किती मजबूत होती हे लक्षात येते. मधुमकरंद गडाकडून प्रतापगडाकडे जाण्यासाठी हा पूल बांधला होता.
परतीच्या प्रवासात बस मधे शांत बसतील, ते ट्रेकर कसले. कितीही मोठा ट्रेक असो पण सगळ्यांचा उत्साह तितकाच ओसंडून वाहत असतो. अंताक्षरी, दम शेराज ने तर सगळे अगदीच मस्त एन्जॉय करतात. या ट्रेक मधे खास उल्लेख करावा अशा ट्रेक भिडू मिळाल्या. अनुपमा, ज्वाला, प्रेरणा, कृपा आणि हर्षा ... ह्या स्वतःच्या हिमतीवर पूर्णपणे स्वतंत्ररित्या सगळं जग फिरण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या आणि काही ठिकाणं फिरुनही आलेल्या...जिद्दी मुली. त्यासाठी प्रवासीकिडाच असावा लागतो.
भटकंतीची आवड असणारी आणि आपल्यासारखी भन्नाट विचारांची मैत्रिण बरोबर असेल तर काय हटके ट्रेक होईल ना! अशीच एक माझी कॉलेज फ्रेंड वनिता व तिची मुलगी प्रज्ञा या ट्रेकला आल्यामुळे खुप मस्त मजा आली आणि आलेल्या माझ्या सगळ्या मधुर फ्रेंड्स सोबतचा...असा हा मधुर अठवणींचा मधाळ ट्रेक... मधुमकरंद गड कायम अठवणीत राहील.
मी व वनिता...
माऊंटन एज अॅडव्हेंचर चा..... 84 वा ट्रेक 'मधु मकरंद गड'... 14 व 15 एप्रिल रोजी ठरला. त्याप्रमाणे 14 एप्रिल रोजी रात्री 11 :30 ला... निगडीतून एक बस व दुसरी तळेगांवातून अशा दोन बस चांदणी चौकातून बंगलोर हाय वे वरुन निघाल्या. पुढे एके ठिकाणी नारळ वाढवून प्रवास सुरू झाला.
यावेळेस मुलींची संख्या उल्लेखनीय होती. मधुमकरंद गडाची सर्व ट्रेकर्सना आतुरता आणि मला जावळीच्या जंगलाची... त्यामुळे बस मध्ये फारशी झोपही लागली नाहीच. बस वाई मार्गे पाचगणी महाबळेश्वर हातलोट येथे जाणार होती. पसरणी घाटातून बस जशी वर निघाली तशी थंड हवेचा पहाड महाबळेश्वर चढतोय याची जाणीव होऊ लागली. पहाटे साडेपाच वाजता 'जंगल व्हॅली रिसॉर्ट' चतुरबेट रोड येथे बस थांबल्या. बस मधेच लिडर ने फर्मान सोडले इथे सगळ्यांना तासात फ्रेश होऊन चहा नाश्त्यासाठी तयार रहायचे आहे आणि त्याप्रमाणे सगळ्यांची लगबग सुरू झाली. पहाट असल्याने आजून अंधार होता. बस मधून उतरल्या बरोबर अंगावरुन थंड हवेची झुळूक गेली... अहाहा!! किती अल्हादायक व्वा!.. पहाटेच्या कमालीच्या निस्तब्ध वातावरणात पाखराची एखादी शीळ हलकेच छेडून जात. रखरखत्या उन्हाळ्यात हवा हवासा वाटणारा थंडावा इथे कमालीचा जाणवत होता. फ्रेश होई पर्यंत हळूहळू उजाडत होतंच. आजूबाजूची हिरवीगार वनराई पाहून मना बरोबर नेत्र ही सुखावू लागले . दिवसाची इतकी सुंदर सुरुवात... अप्रतिम अशी निराळीच प्रसन्नता अनुभवत आम्ही नाश्ता व चहाचा मनमुराद अस्वाद घेतला.
इथून पाच कि. मी. वर असलेल्या कसरुड या गावी आलो. इथे ग्रुप लिडर मंदार सरांनी ट्रेक विषयी सर्व सुचना दिल्या व इथूनच या सुंदर गावातून सकाळी सात वाजता ट्रेक सुरू केला. सकाळचं कोवळी उन्ह आणि प्रसन्न वातावरणात सगळे उत्साही ट्रेकर्स आपापल्या ट्रेकिंग स्टाईल मध्ये कसे मस्त दिसत होते.
थोडावेळ चालल्यानंतर घनगर्द जंगलाची माझ्या आवडीची वाट सुरू झाली. . अशा आडवाटा मला नेहमीच आवडतात फक्त त्या तुडवायची झिंग असली की झालं, मग आमच्या सारख्या निसर्गप्रेमीनां अशा जंगलीवाटा आणि आडवाटा नेहमी खुणावतच राहतात,काय करणार...!आणि माझी ही झिंग तर या जंगलवाटा मुळे आणखी वाढतच चाललीय.
जंगल वाट
एप्रिल मध्येही हिरवेगार जंगल आणि चढणीच्या पायवाटेवर पडलेल्या पाचोळ्याचा खच त्यामुळे पाय चांगलेच सटकत होते .
या जंगलात रानडुक्करांचा वावरही जास्त आहे, त्यामुळे कोणीही ग्रुप सोडून मागेपुढे एकटे राहू नये, अशी वर्णीच दिलेली. कारण ते एकट्या दुकट्यावर हल्ला करतात.त्यामुळे कशाला कोण एकटं राहिल बाबा..! दुसरं असं की इथे वेगवेगळ्या सापांचा घरोबा आहेच. त्यामुळे चढण चढताना कितीही वाटलं तरी एखाद्या झाडांला सुध्दा धरायची सोय नाही , काय सांगावं कुठुन एखादा यायचा भस्सकन बाहेर! त्यांचा काही नेम नाही!
म्हणून आपली काळजी घेतलेली बरी.
वारं नसल्याने पानांची सळसळ नसली तरी पाखरांचे इतके वेगवेगळे मंजुळ आवाज कानावर येत होते की, कुठल्याही म्युझिक सिस्टीम सर येणार नाही. आवाजावरून काही पक्षी ओळखता येत नसले तरी कर्णमधुर नक्कीच!! असे हे पाखरांचे मंजुळ आवाज शहरातल्या कर्णकर्कश गोंगाटात विरुनच गेलेत आणि दर्शन तर दुर्मिळच झालय. जंगल भटकंतीत जर कोणी डिओ किंवा परफ्यूम मारला असेल आणि मधमाश्यानां तो लयीच आवडला तर त्याला त्यांच्याकडून मस्त पाहुणचार मिळणारच! कारण या जंगलात मधमाश्यांची खुप पोळी आहेत. त्यामुळे इथून भरपूर प्रमाणात मध मिळतो. कदाचित यामुळेही या वनदूर्गला मधुमकरंद म्हणत असावेत. आम्हाला या वाटेवर कळशी भरभरुन मध घेऊन जाणारे गावकरीही दिसले.
एके ठिकाणी मध काढताना गावकरी..
दोन तासाच्या भटकंती नंतर जिथे जंगल संपते तिथे एक प्रशस्त शिवमंदिर लागते. या मंदिरात वन्यप्राण्यापासून अगदी सुरक्षित राहता येते. फक्त कुठेही पाण्याची सोय नसल्याने ती आपली आपण करावी. इथून कोयना धरणाचा पसरलेला अथांग जलाशय व त्यापलीकडील वासोट्याचे जंगल नजरेत भरते.
शिवमंदिर...
ओहो काय योगायोग झाला... माझे ट्रेकगुरु माझे सासरे श्री. रामचंद्र पवार.. व त्यांचे तीन मित्र आदल्या दिवशीच इथे कॅम्पिंगला आले होते. त्यामुळे आमची अगदीच ट्रेकमय भेट झाली. या वयात देखिल ट्रेक चालू आहेत म्हणून सर्वांना त्यांचा खुप अभिमान वाटला. ग्रुप लिडर मंदार सर व राणे सरांनी त्यांची भेट घेतली व म्हणाले आम्हीही असेच ऐंशी वयापर्यंत लोकांना अनेक ट्रेक घडवू असे आशिर्वाद द्या.
माझे सासरे आणि मी
यानंतर आम्ही पुढे मधु गडावर जाण्यासाठी निघालो.
गडाची मुरबाड घसरडी वाट आणि वर मोकळं आकाश, त्यामुळे आता उन्हाची तीव्रताही वाढू लागली आणि घामाच्या धाराही. त्यासाठी प्रत्येकजन काही ना काही एनर्जी ड्रिंक, पाणी घेत होते. कमालीचा चढ आणि तितकाच उतार. त्यामुळे थोडी दमछाकही होत होती. गडाच्या निम्म्याहून कमी टप्प्यात आल्यावर थोडे थांबलो.
इथून गडाच्या सगळ्या बाजूने वेढलेल्या जावळीच्या घनगर्द जंगलाने थकल्या डोळ्यांनां जरा शांत केले.
गडाच्या मध्यावर दोन वाटा फुटतात एक डावीकडे तर दुसरी उजवीकडे दोन्ही बाजूंनी गडावर जाता येते. उजव्या बाजूने गेल्यास पांडवकालिन पाण्याचे टाके लागते पण हे पाणी सध्या तरी पिण्यालायक नाही.
टाक्याच्या डाव्याबाजूने गडावर जाण्यासाठी एक अवघड राॅकपॅच आहे. हा पार केला की आपण मधु गडावर पोहचतो. उन्हाळ्यामुळे गडावर अगदीच रखरखाट होता. किल्ला तसा बांधलेला दिसत नाही, तटबंदी कुठेही नाही पण माथ्यावर अजून एक शिवमंदिर आहे व त्यासमोर एकच मोठे झाड आहे. त्याच्याच सावलीत आम्ही 64 ट्रेकर्स विसावलो.
सगळ्यानी बरोबर आणलेला खाऊ एकमेकांना देत घेत व एकमेकांची मस्ती करत थोडावेळ तिथेच रेंगाळलो. मंदार सरांनी इथे ट्रेकिंग ग्रुप व गडाविषयी माहिती दिली. इथेच ग्रुप फोटोही घेतले.
"माऊंटन एज अॅडव्हेंचर पुणे "
हा गड फक्त टेहाळणी साठी वापरत असून समुद्रसपाटीपासून 4000 फुट उंच आहे. कारण इथून आजूबाजूच्या सर्व परिसरावर चोख नजर ठेवता येते. गडावरून आजूबाजूला चौफेर नजर फिरवली तसा सह्याद्रीचा लवाजमा दूरदूरवर पसरलेला होता. एकीकडे दणकट पहाड महाबळेश्वर व प्रतापगड आणि कोकण तर दुसरीकडे रसाळगड सुमारगड महिपतगड हे त्रिकूट अगदी एकमेकांना सावरून उभं होतं. समोर चकदेव महिमंडण वासोटा कोयनेचा आफ़ाट जलाशय. म्हणजेच इथून एकाचवेळी एकीकडे घाटावर तर दुसरीकडे कोकणावर नजर ठेवता येत होती. हे सह्याद्रीचं पसरलेलं विहंगम दृश्य नजरेत सामावून व मधुगडावरुनच मकरंदला निरोप देऊन गड उतरण्यास सुरुवात केली.
गडाच्या पायथ्याशी आल्यावर तिथे असलेल्या शिवमंदिर समोरच्या शेड मधे... इतिहासप्रेमी सारंग सरांनी.. इतिहासात अजरामर झालेली जावळी थोडक्यात समर्पक व अतिशय सुंदर भाषेत सांगितली. शिवरायांचे कौतुक उदगार ऐकून तर सगळे अगदी भारावून गेले. खरंच रोमांच उभे राहिले...!!!
सारंग सरजंगलातून परत येताना एके ठिकाणी झुडपावरुन एक हिरवागार साप 🐍 मस्त निघाला होता म्हणे त्याला पाहून बरेच जण पुढेही गेले होते. याची चाहूल लागताच आम्ही मागचे ट्रेकर्स त्याला पाहण्यासाठी पटपट पुढे आलो. ग्रुप मधिल आमचे सर्पमित्र संजय निकाळजे सरांनी त्या सापाविषयी संपूर्ण माहिती दिली ती अशी... हा हरणटोळ असुन निमविषारी आहे. याला चाबुकस्वार असेही म्हणतात. हा अंगाने बारीक असला तरी चिमणी सुध्दा खाऊ शकतो व खाल्ल्यानंतर दिड इंच फुगतो. रंगाने हिरवागार असुन त्याच्या अंगावर पिवळ्या रंगाचा रेडिअम चा पट्टा असतो तो ही दाखवला. या रेडिअम मुळे रात्री अंधारातही हा चमकतो हि माहिती माझ्यासाठी खुपच चकित करणारी होती. निकाळजे सरांनी अतापर्यंत विस हजार आठशे साप 🐍 पकडून व्यवस्थित जंगलात सोडून दिले आहेत. हा ही हरणटोळ चुकून पायवाटेवर येऊ नये म्हणून त्याला जरा आत जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडले. तरीही तो जाई पर्यंत आम्ही त्याच्या मोहक हालचाली टिपत होतो. हा माझ्यासाठीखुप छान अनुभव होता.
जंगलवाट संपवून परत आम्ही रिसॉर्ट व्हॅलीकडे आलो... तिथे जेवणावर यथेच्छ ताव मारुन, अर्धातास तिथेच आराम करुन परत पुण्याची वाट धरली. परतताना पार घाटात कोयना नदीवर हा शिवकालीन पूल लागतो. 350 वर्षे झाली तरी अजूनही सुस्थितीत व भक्कम पूल आहे, नाहीतर आताचे पूल उद्घाटनप्रसंगीच कोसळतात. यावरुन शिवाजी राजांची संपर्कप्रणाली किती मजबूत होती हे लक्षात येते. मधुमकरंद गडाकडून प्रतापगडाकडे जाण्यासाठी हा पूल बांधला होता.
परतीच्या प्रवासात बस मधे शांत बसतील, ते ट्रेकर कसले. कितीही मोठा ट्रेक असो पण सगळ्यांचा उत्साह तितकाच ओसंडून वाहत असतो. अंताक्षरी, दम शेराज ने तर सगळे अगदीच मस्त एन्जॉय करतात. या ट्रेक मधे खास उल्लेख करावा अशा ट्रेक भिडू मिळाल्या. अनुपमा, ज्वाला, प्रेरणा, कृपा आणि हर्षा ... ह्या स्वतःच्या हिमतीवर पूर्णपणे स्वतंत्ररित्या सगळं जग फिरण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या आणि काही ठिकाणं फिरुनही आलेल्या...जिद्दी मुली. त्यासाठी प्रवासीकिडाच असावा लागतो.
भटकंतीची आवड असणारी आणि आपल्यासारखी भन्नाट विचारांची मैत्रिण बरोबर असेल तर काय हटके ट्रेक होईल ना! अशीच एक माझी कॉलेज फ्रेंड वनिता व तिची मुलगी प्रज्ञा या ट्रेकला आल्यामुळे खुप मस्त मजा आली आणि आलेल्या माझ्या सगळ्या मधुर फ्रेंड्स सोबतचा...असा हा मधुर अठवणींचा मधाळ ट्रेक... मधुमकरंद गड कायम अठवणीत राहील.
मी व वनिता...
Great. Apratim likhan !!!!
ReplyDeletewell written ..
ReplyDeleteसुरेख!!!!
ReplyDeleteअप्रतीम👌
ReplyDeleteKhup chan trekking ved...ani anubhav varnan kanyachi paddhat
ReplyDeleteTraking information very nice. We know about mdhumakarnd Gad . ///////👍👍👍👍👍👍
ReplyDelete