एक सुंदर घाटवाट... रतनगड ते हरीश्चंद्रगड ट्रेक
एक सुंदर घाटवाट... रतन गड ते हरीश्चंद्रगड गड
25 आणि 26 जानेवारी 2020..
25 आणि 26 जानेवारी 2020..
दिवस पहिला....25 जानेवारी... रतनवाडी ते कुमशेत
दुपारचे अडीच वाजलेले आम्ही कातराबाई खिंडीत अडीच हजार फुट उंचीवर उभे.... एका बाजूला काळाकभिन्न कातळ तर दुसर्या बाजूला कातराबाई चा चढून आलेला डोंगर आणि समोर खाली गर्द हिरवे घनदाट जंगल असे विहंगम दृश्य पाहून आमच्या पाचही जणांच्या तोंडातून वाह वाह वाह क्या बात है! हा एकच सूर... कारण समोरचा नजारा होताच तसा अगदी मनाला भुरळ पडणारा... अप्रतिम...
आपल्या महाराष्ट्राला लाभलेली सह्याद्रीची रांग आणि यावर अमाप प्रेम करणारी इथली माणसं अन् त्याच्या कुशीत जाण्यासाठी सतत तयार असणारे आम्ही ट्रेकर्स....झालं STF चा msg ग्रुप वर येऊन धडकला आणि वाचल्या बरोबर लगेच ट्रेक बूक करून टाकला कारण ट्रेक होताच तसा रतन गड ते haichndra गड. या ट्रेकच वैशिष्ट्य म्हणजे अतिशय सुंदर अशी ही पायवाट... डोंगर चढवनारी , कधी दरीत उतरणारी, तर कधी घनदाट जंगलात घेऊन जाणारी आणि नदीच्या काठावरून जाणारी सुंदर पायवाट दोन दिवसात हे सगळं अनुभवायला मिळणार म्हणुन खूपच भारी वाटत होतं.
आमचा STF ग्रुप पुणे म्हणजेच सह्याद्री ट्रेकर्स फाऊंडेशन....
 सर्वात कमी कॉस्ट असते या ग्रुप ची या दोन दिवसाची ट्रेक फी ओन्ली ₹950 /-......

STF चे ट्रेकर्स आणि foundar श्री सुरेंद्र दुगड गेली 575 रविवार अविरत ट्रेक करित आहेत त्यासाठी त्यांना माझा मानाचा मुजरा 🚩...
या ग्रुप बरोबर माझा तसा हा तिसरा ट्रेक अतिशय शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध असा ग्रुप आहे.
24 तारखेला रात्री 10:45 la पुण्यातून आमच्या दोन बस निघाल्या. ज्याच्या त्याच्या पिकअप पॉईंट वरून प्रत्येकाला उचलत उचलत आम्ही रात्री 12 ला पुणे सोडले. सकाळी 6 वाजता इगतपुरी घोटी मार्गे रतन वाडी ला पोहचलो. अजून गांव तसं साखर झोपेतच होतं थंडीच होती तशी. रतनवाडी सगळ्या बाजूने डोंगरांनी वेढलेले छोटसं सुंदर गांव. काहीवेळात सर्वजण आपापल्या परीने फ्रेश होऊन आले, तोपर्यंत STF च्या टीमने सर्वांसाठी मसाला चहा, मसाले दूध टोस्ट तयारच ठेवले होते. रतनवाडीतील ती सुंदर सकाळ, कोवळी उन्ह, वातावरणातील थंडी आणि समोर गरमागरम वाफाळता चहा... व्वा ये हुई ना बात..... या गरमागरम पेया मुळे रात्रभर केलेल्या प्रवासाची मरगळ कुठल्या कुठे गुडूप झाली आणि एका नवीन जोश मध्ये भराभर आवरून सर्व ट्रेकर्स अमृतेश्वर मंदिराजवळ ट्रेक लीडर कडून ट्रेक बद्दल माहिती घेण्यासाठी सज्ज ही झाले.

याच गावात 10 व्या शतकातील हेमाडपंती पद्धतीने बांधलेले अमृतेश्वराचे सुंदर मंदिर आहे. त्याच्या जवळच एक पुष्करिणी तीर्थ आहे.
बर्याच नद्यांच्या उगमस्थानी अशी मंदिरे आणि तीर्थ बांधलेली आढळतात. या गडावरून प्रवरा नदीचा उगम होत असल्याने हे मंदिर आणि तीर्थ येते आढळून येते.

इथेच ट्रेक लीडर ने ट्रेक बद्दल माहिती दिली व 9:45 am. ला ट्रेक सुरु झाला, गावातून छोट्याश्या रोडवरून चालत चालत पुढे प्रवरा नदीवरील छोटासा पूल ओलांडून समोरील वाटेवरून आम्ही 62 जणांनी रतन गडाकडे कूच केली. ही वाट नदीच्या कडेकडेने जाते, बाजू बाजूने शेती दिसत होतीच.
थोड्याच वेळात जंगलाच्या दिशेने वाट सुरु झाली. वाटेत कोरडे पडलेले ओहळ तर काही ठिकाणी पाणी असलेले ओढे पार करत करत पुढे निघालो. जस जसे पुढे जात होतो तस तसे रतनगड चा खुटा आणि रतनगड नजरे समोर येत राहत होते.

पुढे एके ठिकाणी सपाटी वरून नदीवर बांधलेला बंधारा दिसतो.
साधारण तासभर जंगलातून चढाई केल्या नंतर एके ठिकाणी दोन वाटा फुटतात एक रतन गडावर जाते दुसरी कातराबाई खिंडीत तिथे तसा बोर्ड लावलेला आहे.
इथून पुढे थोडेसे वर चालत गेल्यावर अतिशय अवघड अश्या ठिकाणी टप्प्या टप्प्याने पाच लोखंडी शिड्या लावलेल्या आहेत.
त्यामुळे इतका अवघड टप्पा आपण सहज पार करू शकतो. त्याकाळी आपले मावळे सरदार कसे चढत असतील असा विचार मानत येतोच येतो. सर्व शिड्या पार करून आपण गडावर प्रवेश करतो. तिथून उजव्या हाताला एक वाट जाते त्या बाजूला प्रचंड मोठा असा पसरत गेलेला कातळ आपलं लक्ष वेधून घेतो. याच कातळात एक देवीचे मंदिर आहे व तसेच पुढे गेल्यावर या कातळात एक मोठी गुहा आहे. या गुहेतून समोरील नजारा डोळ्यात भरतो.
तसेच उलट चालत येऊन रतन गडाच्या प्रवेशद्वारा तून गडावर येता येते. प्रवेशद्वार छान आहे त्यावर गणपती कोरलेला दिसतो बाकी पडझड झालेली आहे. गड माथ्यावरून डाव्या हाताला कातराबाई चा सुंदर डोंगर दिसतो आणि उजव्या बाजूला समोर जो काही नजारा दिसतो तो अवर्णनीय...
वाह सुरेख जणू काही सह्याद्रीतील रत्नाची माळ भासावी तशी एका मागे एक दिमाखात उभी डोंगराची माळ... दुपारचं ऊन गर्द हिरवट रंगाचे उंचच उंच डोंगर आणि त्यात पसरलेलं धुरकट धुकं व्वा! किती वेळ पाहू आणि किती नको असं झालेलं आणि त्यावेळी एकच शब्द बाहेर पडला 'अनमोल'... अनमोल रतन आणि खरंच अनमोलच आहे कारण फिरून फिरून मान परत तिकडेच वळायची असा हा सुंदर नजारा मनात डोळ्यात साठवून प्रयत्नपूर्वक मागे वळलो कारण गड उतार होऊन कातराबाई खिंड पार करून कुमशेत गाठायचे होतं ना. इथून दुरूनच कडेलोट चा डोंगर पाहून घेतला खरंच कडेलोट काय आहे हे इथं आल्यानंतर कळते.
रतनगड ..
रतन गड तसा पूर्ण पाहता येणार नाही हे आधीच सांगितल्याने आम्ही प्रामाणिक पणे तिथेच थोड्या अंतरावर असलेला तोफा डागण्याचा बुरुज आणि त्याच्या मागे असलेलं पाण्याचं टाके पाहून घेतलं. पण पिण्याच्या पाण्याचं टाके पाहिल्याशिवाय आणि त्यातलं पाणी पिऊन घेतल्या शिवाय समाधान कसे होणार. म्हणुन तिथेच थोड्या अंतरावर असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्याकडे भरभर जाऊन बॉटल भरून घेतली अतिशय थंड स्वच्छ पाणी, जिवंत झरा असल्याने हे टाके बाराही महिने भरलेले असते.
थकला भागला जीव पाणी पिऊन तृप्त झाला. इथून समोर भंडारदरा धरणाचा पसारा दिसतो तसेच पलीकडे सर्वोच्च कळसूबाईचे शिखर व आलंग, मदन, कुलंग हे प्रसिद्ध त्रिकूट नजरेस पडते. लगेच इथून भराभर खाली उतरून आलो व जाताना ज्या दोन वाटा लागल्या होत्या तिथेच सपाटीवर सगळे जण पेटपूजा करायला बसलो. सगळ्यानी एकमेकांच्या जेवणाचा मनमुराद स्वाद घेतला. धनंजय तू आणलेले थालीपीठ कारल्याची भाजी आणि हरभरा पालेभाजी वाह अजून जिभेवर चव रेंगाळतेय. माझा डब्बा तर मी खाल्लेच नाही.
सगळ्यानी पटापट आवरून घेतले व एक वाजता कातराबाई खिंडी कडे मार्गस्थ ही झाहले.
इथून पुढे पाच तासाचा पल्ला अन् मग कुमशेत गावात मुक्काम.

ही वाट घनदाट जंगलातून जात असल्याने दुपारचे 1 वाजले तरी ऊन अजिबात लागत नव्हते.
आता कातराबाई चा डोंगर चढायचा होता, पायवाट जंगलातून असली तरी जेवण केल्यामुळे चाल थोडी मंदावली होतीच आणि चढन दमवनारी होती. जंगलातील अतिशय सुरेख अशी वाट आम्ही चढत होतो, वाटेत भले मोठे दगड आमची वाट आडवीत होते पण फिकर नॉट ये सिलसिला तो चलता रहेगा.
चढन चढून चढून भरपूर दमायला होत होतं पाणीही बर्यापैकी संपत आलेलं आणि थोड्याच वेळात वाटेत आम्हाला एक छोटासा वाहता झरा दिसला मग काय घेतलं की बॉटल मध्ये पाणी भरून आणि पिऊन, थोडा वेळ लागला पण काम बन गया.
अजून बरच चढणं बाकी होतं चालून चालून थकलो होतो पण जंगल काही संपत नव्हतं आणि खिंड काही नजरेस पडत नव्हती. वाटेत काही गावकरी स्त्रिया दिसल्या त्यांनाही विचारले किती वेळ लागेल अजून कुमशेत यायला त्याही म्हणाल्या अजून लय लांब हाय बगा. तेंव्हा म्हंटलं अजून आहेच का, बराच वेळ चालल्या नंतर दुरून खिंड नजरेच्या टप्प्यात येऊ लागली आणि काय आनंद झाला म्हणून सांगू... दुरून ही खूप छान दिसत होती.
कधी कधी अश्या चढणीत एक क्षण असा येतोच जेंव्हा नाडीच्या ठेक्यात dj वाजू लागतो मग अश्या वेळी electral धावून येते आणि नाडीच्या ठेक्यात परत नॉर्मल म्युझिक सुरू होतं. एकमेकांना बोलत थांबत उठत बसत फुटू काढत आता आम्ही एकदाचे खिंडीत पोहचलो. अस्सा उरावर येणारा कातराबाईचा डोंगर आम्ही पार केला होता खरच वाटेना पण आम्ही खिंडीत पोहचलो होतो आणि सर्वांचे चेहरे घामाने निथळून मस्त चमकत होते. वाटेत एक गावकरी महिला आम्हाला दिसली ... तिच्या बरोबर धनंजय ने एक selfie घेतला तेंव्हा ती म्हणाली. "भाऊ लई दागिने घातल्यात सगळे फुटू काढत्यात बघ" ..
मग फुटू झाले शूट केले कारण परत इथे येऊ न येऊ म्हणुन परत परत हा सुरेख नजरा डोळ्यात सामावून घेत होतो. इथे आमच्या ट्रेक लीडरने इथून दिसणार्या डोंगर रांगाची माहिती दिली. इथून आपल्याला कुमशेत चा कोंबडा (एका डोंगरांचे नाव), सादले घाट, Harichandra शिखर, naphta, एकीकडे आज्या
डोंगर, दिसतात.

आता पलीकडे खिंड उतरून खाली असलेले कुमशेत गाव गाठायचे. चढाई करताना दमछाक होत असली तरी दरीच्या बाजूने उतरताना तेवढाच तोलही सांभाळावा लागतो. प्रत्येक जण आपापल्या परीने सावकाश खाली उतरत होते. चढणे जितके सोपे वाटते तितकेच उतरणे अवघड कारण आपण गुरुत्वाकर्षण मुळे खाली खेचले जात असतो. उतारावर सगळ्यात जास्त उपयोगी पडते ती हातातली काठी. काठी मुळे शरीराचा तोल खूपच सांभाळला जातो. उतरताना दम अजिबात लागत नसला तरी गुडघ्यावर आणि पायाच्या बोटावर ताण येऊन बोटे दुखायला लागतात. उतरताना प्रत्येकजण शांतपणे उतरत होता कारण 'चुकीचं पाऊल संकटात नेईल' अश्या उतारावरच्या पायवाटा आपल्याला संयम शिकवून जातात.
66जस जशी वाट खाली खाली जात तस तसं हवेलीत फरक जाणवू लागला होता. आम्ही चढून आलेलो घनचक्करची रांग घाटातली गार हवा आणि दुसर्या बाजूला उतरणारी घाटातली कोरडी हवा जाणवू लागली. कातराबाई खिंड उतरायला ही अवघड दरीचा निम्मा टप्पा संपला की पुढे जंगलातून ही वाट खाली कुमशेत कडे घेऊन जाते. आम्ही शेवटचे पाचजण संध्याकाळी पाच वाजता कुमशेतला पोहचलो. इथेही छोट्या छोट्या वाड्या आहेत.
कुमशेत छोटेसे सुंदर गाव इथला मावळतीचा सूर्य एन्जॉय करत आम्ही एकदाचे मुक्कामाच्या ठिकाणी गावात पोहचलो.
रतनवाडी ते रतनगड.. कातराबाई खिंड ते कुमशेत गाव... एकूण अंतर 22 km झाले. दुसर्या दिवशी ही 20 km अंतर पार करायचे आहे. एका गावकर्यांनी त्यांच्या टुमदार घरात सर्वांसाठी घरात ओसरीवर आणि अंगणात राहण्याची, आणि गरम पाण्याची सोय करून दिली बाकी मेंबर्स बरेच आधी पोहोचले होते. STF टीम सर्वासाठी जेवणाची तयारी करत होतीच. ज्यांनी tent आणले होते ते अंगणात tent लावत होते.
रात्री सर्वानी गरम गरम जेवणाचा आस्वाद घेतला.
जेवण करून बाहेर आलो तर थंड वातावरणात वर आकाशात गच्च चांदणे भरले होते अमावस्या असल्यामुळे ते आणखीच उठून दिसत होते हे चांदण्यांनी भरलेलं आकाश पाहून वाटलं ''या पंखा वरती मी नभ पांघरते, मी मुक्त मोरणी बाई चांदण्यात नाहते" खरंच असा नजारा शहरात कधीच अनुभवता येत नाही. काही tent मध्ये काही ओसरीवर तर काही घरात आपापल्या sleeping बॅग मध्ये झोपी गेले. आम्हा लेडीज ना घरामधे झोपण्याची सोय करून दिली. कोणी आपापल्या sleeping बॅग मधे तर कोणी मॅट वर तर मला आणि डॉ.अश्विनी ला मस्तपैकी गोधडी वर झोपायला मिळाले. आज काल अशी गोधडी कुठे मिळायला म्हणुन आम्ही खुश होतो. गप्पा मारत मारत कधी झोप लागली कळले देखील नाही. त्या कौलारू घरात खूप छान झोप लागली.
आजचा ट्रेक खूपच मस्त झाला . ही सुंदर पायवाट आम्ही खूप खूप एन्जॉय केली . तसाही ट्रेक हा शेवटी कुठेतरी संपणार असतो पण तो मधला प्रवास मला खूप भारी वाटतो आणि खूप आवडतो. आणि प्रत्येक ट्रेक मधे ट्रेक भिडू भेटतातच त्यामुळे प्रवासाची रंगत अजून वाढतेच. देशपांडे काका धनंजय, राहुल आणि ज्योती, डॉ अश्विनी खूप खूप मजा आली . 🚩

Mast 👍👌👌👌
ReplyDeleteThank you
Deleteछान लेख
ReplyDeleteMast ,nisargacha Chan aswad ghetes.
ReplyDeleteThank you
DeleteWell written, keep it up! 〽️🚩👍
ReplyDeleteThank you
DeleteNice ..
ReplyDeleteThank you
DeleteThank you all my dears
ReplyDeleteMastch re
ReplyDeleteThank you मंजे
ReplyDelete