एक सुंदर घाटवाट.... रतनगड ते हरीशचंद्रगड
26 जानेवारी 2020.... दुसरा दिवस
..... अलार्म वाजला तशी जाग आली. पहाटे चे 5 वाजलेले एकदम मस्त वाटले कालची 22km ची तंगडतोड कुठल्या कुठे गायब झाली बहुदा या गोधडीची कमाल असावी. शहराच्या झगमगाटा पासून खूप खूप दूरवर डोंगराच्या कुशीत वसलेल्या गावातल्या एका कौलारू घरात पथारी पसरायला मिळणे म्हणजे भाग्यच. सकाळी सगळे जण तास दीड तासात फ्रेश झाले. तोपर्यंत STF टीमने सर्वांसाठी मस्त आल्याचा वाफाळता चहा तयारच ठेवला होता. उपमा बनवणे चालू होते. जो तो आपापल्या परीने हातभार लावत होते. मग सर्वांनी नाश्ता करून भराभर आवराआवर करून एका नव्या जोश मध्ये Harichandra साठी तयार झाले.
26 जानेवारी असल्याने सकाळच्या त्या उत्साही वातावरणात सर्वांनी राष्ट्रगीत म्हणुन प्रजासत्ताक दीन साजरा केला. ज्यांच्या कडे रात्री आम्ही मुक्काम केला होता त्यांचे आम्हा सर्व ट्रेकर्स च्या वतीने दुगड सरांनी आभार मानले आणि इथेच सर्वाना आजच्या ट्रेक बद्दल माहिती दिली व सकाळी 8 वाजता कुमशेत गावातून ट्रेक सुरु झाला.
कालचा अनमोल रतन गड, ती दिमाखदार खिंड व एक सुंदर घाटवाट मागे टाकून Harichandra च्या ओढीने पाऊले झपाझप पडू लागली. मला तर ओढ लागली होती त्या नदीच्या काठाकाठाने जाणार्या जंगल वाटेची. थोडावेळ चालल्या नंतर उजव्या बाजूला मुळा नदीचे खोरे लागते, इथून नदी पात्र खूपच खोल खोल दिसते आणि दोन्ही बाजूने उंच गर्द हिरव्या दर्या खूपच सुंदर असं हे खोरं.
आता डाव्या बाजूने जंगल वजा झाडीतून मळलेल्या पायवाटेवरून हळू हळू खाली खाली उतरत त्याच मुळा नदीच्या पात्रात येऊन पोहोचलो.
नदी पात्र चांगलच रुंद होतं याला पार करून परत डाव्या हाताने नदीच्या काठाकाठाने चालू लागलो. काठाच्या बाजू बाजूने असलेली हिरवीगार शेती सकाळच्या उन्हात मस्त चमकत होती आणि या शेताच्या बांधावरून आमची स्वच्छंद उनाड भटकंती खूप भारी वाटत होतं.
पुढे या वाटेवर अतिशय दुर्गम अशी पाडी लागली. इथे ग्रुप मधील सदस्यांनी आणलेले कपड्यांचे वाटप केले. तेंव्हा तिथली मुलं नुकताच शाळेतून प्रजासत्ताक दिन साजरा करून आलेली दिसली.
इथून पुढे कधी सरळ तर कधी वळणावळणाच्या वाटा आम्हाला पुढे घेऊन जात होत्या. काही अंतरावर अजून एक पाडे लागले. इथून उजव्या बाजूला असलेला कलाडगड सारखं सारखं आमचं लक्ष वेधून घेत होता. थोडे पुढे गेल्यावर नदी पत्रात चांगलेच वाहते पाणी दिसू लागले. त्यामुळे इथेच रिकामी बॉटल भरून घेतली व भरपूर पाणी पिऊन घेतले.

तो सुंदर सरीतेचा काठ आजूबाजूचे पसरलेलं जंगल आणि दूरवर दिसणारे प्रपात मनाला सारखे भूल पाडत होते. चित्त सुखावून टाकणारं दृश्य कितीही पाहिलं तरी समाधान काही होत नव्हते, कारण जास्त वेळ तिथे थांबू शकत नव्हतो ना. पुढे जंगलातून मस्त पायवाट सुरू झाली जंगलातली ती सुरेख चढण खूप दमवणारी नव्हती पण पल्ला बराच होता.
बरोबर घेतलेलं नदीचे पाणी थकलेल्या जिवाला तृप्त करत होतं. प्रत्येकाचा आणलेला खाऊ एकमेकांना देतघेत थांबत फोटो काढत जंगलातून वाटचाल चालू होती. पुढे बराच वेळ चढ उतार, चढ उतार करत करत एकदाचे सपाटीला आलो.
आता झाडी नसल्याने व उन्हात चालून चालून जवळचे पाणी संपत आलेले. याच वाटेवर मेथी मिर्ची भाज्यांची पिकं दिसली मी काही मिरच्या तोडून घेतल्या जेवणात खाण्यासाठी एकदम फ्रेश. तसेच पुढे गेल्यानंतर ऐके ठिकाणी विहीर दिसली आणि तिथेही आम्ही संपत आलेल्या बॉटल भरून घेतल्या.
थोड्याच वेळात बर्यापैकी रस्ता दिसू लागला आणि घरेही दिसू लागली हेच ते पचनाई गाव. याच गावातून आम्हाला गडावर जायचे होते.
या रस्त्यावरून चालत चालत आम्ही गडाच्या पायथ्याशी पोहचलो.
आता सकाळचे 11:30 वाजलेले ज्याच्या साठी एवढी पायपीठ करून आलो तो Harichandra आमच्या समोर उभा ठाकला होता. Harichandra गड म्हणजे सगळ्यागडांचा राजा. सह्याद्रीतील सर्वात सुरेख आणि प्रत्येकाला आपल्या सौंदर्याने भुरळ पडणारा, हा गड म्हणजे ट्रेकर्स साठी पंढरीच. प्रत्येक ऋतूत वेगळा भासणारा नाइट कॅम्पिंग साठी तर रीघ असते गडावर. Harichandra वरील कोकण कडा
तर पाहताच मनाचा थरकाप उडवणारा आणि तितकाच भन्नाट. एकीकडे घनदाट जंगलाने वेढलेले तारामती शिखर आणि भक्तांना स्वतः कडे खेचून घेणारे पाण्यातील शिवलिंग.

कालच नव्याने ओळख झालेले आम्ही ट्रेक भिडू ने गडावर चढण्यास सुरवात केली.
तसं गडावर जाणार्या बर्याच वाटा आहेत पण पचनाई ची वाट सोपी आम्ही याच वाटेने गडावर जाणार कारण पुढे तोलार खिंडीतून पुढे khireshwar गाठायचे होते म्हणुन ही वाट. गड चढताना सुरवातीला बर्यापैकी चढण लागते.
वाटेत गडावर येणार्या साठी लिंबू सरबत, ताक विकणारे बरेच जण बसलेले असतात. अर्ध्या तासाने चढून गेल्यावर उजव्या बाजूला रेलिंग लावलेले आहेत.
कारण वळणा वळणाची चढण आणि दुसर्या बाजूला खोल दरी व गडावर येणारे लोकं ही खूप असतात त्यामुळे सुरक्षितता म्हणुन हे reling लावलेले आहेत.बर्यापैकी पुढे गेल्यावर समोर प्रचंड मोठा आणि लांब कातळ लागतो, मला असे कातळ खूप आवडतात काय ऐट असते त्यांची अगदी अंगावर येणारं त्यांचं ते रौद्र रूप.
याच कातळा च्या डाव्या हाताला कापर तर उजव्या हाताला प्रचंड खोल दरी आहे. या कपारीतून तशीच पुढे पाय वाट जाते इथे वाटेत वाहत येणारी नदी पुढे जाऊन धबधब्याच्या स्वरुपात खाली कोसळते पण सध्या कोरडी असल्याने या खडकाळ भागावर रांजण खळगे दिसले काही ठिकाणी पाण्याने भरलेले होते.
तसाच पुढे एक लोखंडी पूल लागतो पावसाळय़ात याचा नक्की वापर होत असणार. थोडावेळ थोडीशी वरच्या दिशेने पायपीट केल्यावर आम्ही गडावर पोहचलो. साधारण दीड दोन तासात आपण गडावर पोहोचतो.

गडावर बर्यापैकी मोठं पाठार आहे.
इथेच पुष्करिणी तीर्थ, आणि महादेवाचे अति प्राचीन हेमाडपंती पद्धतीचे मंदिर आहे.
मंदिराच्या आवारात मागील बाजूस राहता येऊ शकते तिथेच पिण्याच्या पाण्याचे टाके देखील आहे. इथे आम्ही बॉटल भरून घेतल्या. मंदिराचा परिसर खूप छान सुरेख आहे. तिथेच मंदिराच्या बाजूला असलेल्या गुहेत गुढघ्यापर्यंत पाणी आहे व गुहेच्या मधोमध मोठ्या आकाराचे शिवलिंग आहे. या शिवलिंगाच्या चारही बाजूंनी दगडी खांब कोरलेले दिसतात परंतु त्यातील तीन खांब तुटलेल्या अवस्थेत आहेत.

सर्वांचे दर्शन घेऊन झाल्यावर ऐका ठिकाणी जेवणासाठी बसलो. सर्वांचे उरलेले डब्बे, काकांनी आणलेले उत्तम dryfruits आणि तिथेच मागवलेले पिठले भाकरी व मॅगी (गडावर मिळते बरका).. डॉ नेच मॅगी मागवली म्हंटल्यावर काय बोलणार... डॉक्टर ने बोला मॅगी खाने का तो खाने का...छान सुग्रास जेवण झाल्यावर परत बॉटल भरून घेऊन तोलार खिंडी कडे 3 वाजता रवाना झालो.
ही वाट जंगलातून जाते ऊनही चांगलच होतं. नुकतच जेवण करून निघाल्यामुळे ही चढण दमवत होती आणि घाम ही काढत होती. बराच वेळ चढण चढल्या नंतर एका सपाटीला लागलो.
सगळेच दमल्या मुळे तिथे असलेल्या लिंबू सरबत वाल्यांकडून छान सरबत पिऊन घेतले आणि खिंड उतरायला सुरवात केली. या खिंडी चा उतारही चांगलाच अवघड आहे.
आपण समजतो तशी चढाई उतराई नसते. या खिंडीत थोडाही निष्काळजीपणा चालणार नव्हता कुठे पाय ठेवावा अन् कुठे हाथ ठेवावा एवढा तीव्र उतार आणि बाजूला खोल दरी काही काही ठिकाणी उतरताना पुढचे दिसायचे नाही मग बसत बसत सावकाश एक एक पाऊल जपून टाकत टाकत खिंड उतरत होता.या उतरणीवर प्रत्येकवेळी किती तोल सांभाळावा लागतोय हे खिंड उतरताना अगदी प्रकर्षाने जाणवते म्हणुन की काय या खिंडीला "तोलार" नाव पडले? ही अवघड थरारक उतरण संपल्यानंतर परत जंगलातून वाट सुरु झाली. कधी दरीच्या बाजूने तर कधी जंगलात वाटेत येणार्या मोठाल्या आडव्या दगड धोंड्यातून वाट खाली खाली उतरत होती. साधारण एक तास ही जंगलातील वाट चालून झाल्या नंतर आम्ही सपाटीला लागलो आणि पंधरा मिनिटात आम्ही khireshwar ला पोहचलो.
STF टीमचे गरमागरम जेवण तयारच होते... मिक्स व्हेज रस्सा भाजी, बाजरीची भाकरी, जिरा राइस. सकाळ पासूनची 20 km ची घाटवाट तुडवल्या मुळे चांगलीच भूक लागली होती. सगळ्यानी मस्तपैकी जेवणावर अडवा हाथ मारून तृप्त झालो.
दोन दिवसाची केलेली मस्त भटकंती मनात साठवून संध्याकाळी 7:30 ला परतीचा प्रवास सुरु केला. यादोन दिवसात रतन वाडीतून सुरू झालेली ही वाट डोंगर दर्यातून कधी घनदाट जंगलातून तर कधी नदीच्या काठाकाठाने, वळणा वळणाची, मधेच शेताच्या बांधावरून छोट्या छोट्या पाड्यातून जाणारी 42 km ची घाटवाट आम्ही एन्जॉय करीत आलो होतो. (ही वाट रतनगड... कातराबाई खिंड... कुमशेत गाव....मुळा नदीचे खोरे... पाड्या... पचनाई.... Harichandra... तोलार खिंड... Khireshwar) अतिशय सुरेख अशी घनचक्करची रांग आणि या रांगेतील सुंदर अशी वेगळी घाटवाट आम्हाला अनुभवायला मिळाली. अशा चढाई उतराई मधून आपण खूप काही शिकतो आणि आत्मविश्वास वाढतो. बर्याच तासाची चढाई उतराई करावी लागते हेच या घाटवाटाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. त्यासाठी STF चे मनापासुन खूप खूप आभार..... 🚩 🚩

सुरेखा पवार ...
तुझ्या प्रवासात हरवून जायला जात, ओघवत्या शैलीत उत्तम प्रवास वर्णन, लिहीत रहा...👌👍
ReplyDeleteThank you very much dear
ReplyDeleteSahiiiiiii
ReplyDelete