जुळ्या किल्ल्यांची सफर... किल्ले राजमाची
नमस्कार मित्रांनो.... खूपच दिवसांनी आपण भेटत आहोत. या vlog च्या नादात blog लिहण्या मधे बराच गॅप पडला, त्यासाठी क्षमस्व!! सध्या ट्रेकिंग व्लॉग... Videos बनवतेय , त्यामुळे ब्लॉग लिहायला वेळ कमी पडतोय. सध्या माझे यू ट्यूब चॅनेल सुरू केल्यापासून विडियो एडिटिंग तंत्र शिकण्यात आणि केलेले ट्रेक विडियो एडिट करण्यात बराच वेळ जायचा त्यामूळे हाssssss मोठा गॅप.... 'Sahyavedi Sur' .. या माझ्या चॅनेल वरून तुमच्या पर्यंत पोहोचवलेल्या सर्व ट्रेकिंग विडियो ना तुम्ही दिलेल्या भरभरुन प्रतिसादा बद्दल मनापासून आभार....🙏 असेच प्रेम राहू द्या... 😊 मागील चार महिन्यात केलेल्या सर्व ट्रेक चे ब्लॉग इथून पुढे तुम्हाला वाचायला मिळतील. या पावसाळ्यात राजमाची करायचा खूप मनात होतं. . .. गूगल बाबावर त्याचे मान्सून चे फोटो पाहून तर कधी एकदा जातोय असं झालं होतं आणि काही ना काही कारणानी कॅन्सल होत होतं. झाsssलं पावसाळा संपला पण वेळ काही जुळून येईना. मग सण समारंभ दिवाळी सुट्टीही संपली आणि एकदाचा योग जुळून आला तो 25 नोव्हेंबर 2018 ला, आणि निघालो ही..... रविवारी भल्या पहाटे 5:30 ला मी आणि सुश...