Posts

Showing posts from December, 2020

AKV trail trek... 🚩 🚩

Image
  अनलॉक नंतर चा पहिला ट्रेक AKV... आंबी, काळ, वेळवंडी ट्रेल ट्रेक.... 🚩🚩मानगांव(पानशेत) ते हरपुड    पुनश्च हरिओम..... पण बराच बदल, परत एकदा आयुष्याची नव्याने सुरुवात.... अनपेक्षित पणे आलेल्या करोना संकटामुळे एकाच वेळी सगळे जग हदरले. प्रत्येकाचं आयुष्य बदलून तर गेलंच, पण बहुतांश लोकांचा जगण्याचा आणि आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन ही बदलला . तब्बल 8 महिन्याच्या कैद नंतर सह्याद्री ट्रेकर्स फाउंडेशन पुणे यांच्या बरोबरच्या तंगडतोड ट्रेक करायला परत एकदा नव्याने सज्ज झालो. 🚩 8 नोव्हेंबरला पहाटे 3 : 30 ला घर सोडले आणि 4:20 ला हिंग ने कॉर्नर ला STF च्या बस मधे बसलो देखिल, एवढ्या मोठ्या गॅप नंतर आमच्या पाहिल्या वाहिल्या ट्रेक ची सुरवात झाली आणि तेंव्हा कुठे जिवाला चैन पडली. बस मध्ये ही झोप येत नव्हती, काय करणार सह्याद्री आहेच असा ओढ लावणारा... कधी एकदा भेटतोय असे झालेले अगदी लहान मुला सारखी अवस्था यावेळी मी अनुभवली. याच्या सानिध्यात गेलं की अगदी देहभान हरपून जातं आणि मी.... मी अशी उरतच नाही. बसच्या खिडक्या बंद असूनही थंडी जाणवत होती. बस पुण्याहून पानशेत शिरकोली मार्गे मानगा...