थरारक कलावंतीण प्रबळगड ट्रेक 🚩 14 मार्च 2021
आज सगळीकडे नकारात्मकता भरलेली असताना सह्याद्री ट्रेकिंग ग्रुप ने ट्रेक च्या माध्यमातून कायम सकारात्मकता टिकवून ठेवली आहे. एका छोट्याश्या जंतू मुळे सगळं जग फिटनेस बद्दल जागृत झालेलं आहे. त्या विषाणू ने आज जगाला दाखवून दिले की, तुम्हाला निसर्गातून लाभलेलं शरीर किती निरोगी सुदृढ आणि सक्षम ठेवलं पाहिजे. त्यात भटकंतीची आवड असेल तर क्या बात है.... फिटनेस साठी वेगळं काही करण्याची गरज नाही, ट्रेक करा स्वस्थ रहा मस्त खा....!!! खरं तर प्रत्येक रविवारी STF चे ट्रेक असतात पण नेहमीच जमेल असे नाही पण महिन्यातून दोन ट्रेक करण्याचा प्रयत्न असतो त्याप्रमाणे....... STF चा 14 मार्च 2021 चा प्रबळ गड परिक्रमा ट्रेक व दुसरा कलावंतीण, प्रबळ गड ट्रेक. इच्छा तर दोन्ही कडे जाण्याची होती पण दोन दुर्ग एकाच दिवसात करून पहायचे असल्याने कलावंतीण प्रबळगड बुक करुन टाकला व स्वतःला आजमावून पहायचे ठरवले. त्याप्रमाणे 13 March ला पुण्यातून रात्री 10 :30 ला दोन्ही ट्रेक च्या दोन बस पनवेल ठाकूर वाडी कडे निघाल्या. आम्ही ठाकूर वाडीत रात्री दोन वाजता पोहचलो अपेक्षित वेळे पेक्षा एक तास लवकर... भाऊंची ट्रेक विषयी म...