आषाढातला..... लोभस राजगड
आषाढातले ढग बरसू लागले की थांबायचं नाव घेत नाहीत, आणि बरसायचे थांबले तरी आकाशातली त्यांची गर्दी कायम मग त्या नारायणा च्या दर्शनालाही तरसवतात. अशा ह्या पावसात रानावनात पानाफुलात आणि रसिक वेड्या मनामनात पावसाची काव्य बहरु लागतात, आणि अशावेळी आमची भटकी पावलं या डोंगर दऱ्याकडे धावतात. पावसाच्या सरीत प्रत्येकाला चिंब व्हायचंच असतं पण मला तर डोंगर दऱ्यात बेभान होऊन कोसळणाऱ्या सरींची ओढ...!!! मग रोजची जगरहाटी जरा झुगारून शिरतेच सह्याद्रीच्या कुशीत आणि झोकून देते स्वतःला ओल्याचिंब करणाऱ्या पायवाटेवर.... दाटुन आलेलं आभाळ, हिरवेगार डोंगर आणि त्यांना अडलेले ढग... असे हे गर्द हिरव्या डोंगराला अडलेले ढग मला विलक्षण आवडतात. कधी घाटातून तर कधी डोंगर पायथ्यापासून अतिशय सुंदर दिसतात. मग अशावेळी वाटतं जाऊन बसावं त्या डोंगर माथ्यावर आणि मनसोक्त भटकावं त्या ढगांच्या दाटीत.... हो ना.. तुम्हालाही वाटतं ना..! मला तर नेहमीच वाटतं, आणि हे सगळं आपण पावसाळी ट्रेक मधे अनुभवु शकतो की, आयला! खरच की मग कशाला बसता घरात, करुन बघा की एखादी डोंगर भटकंती... नाहीतर मी आहेच आपल्याला भ...