अंधारबन.... कॉम्बो थ्रील पॅकेज
पावसात मस्त भिजायचे, हिरवेगार डोंगर पालथे घालायचे, धबधब्याखाली चिंब व्हायचे आणि भिजून झाल्यावर टपरीवर गरमागरम 🔥 भजी आणि चहा आहाहः....! असे अनेक अनुभव सर्वांनाच अनुभवायचे असतात. खरं तर हे सगळं अनुभवण्यासाठी सगळे जण अगदी आसुसलेले असतात. आणि हे सगळे अनुभव पावसाळी ट्रेक शिवाय कसे येणार. अशा वेळी खरी धांदल उडते ती आम्हा ट्रेकर्सची गड किल्ले करु की धबधबे पाहू की जंगलात जाऊ, असे एक ना अनेक! चला तर मग आज आपण पावसाळी ट्रेक ला जंगलात जाऊ आणि ते जंगल 2100 फुट उंचावर आणि घनदाट असेल तर...!!! आयू आला ना पोटात गोळा!!!!!!! एवढ्या उंचावर मग हमखास धबधबे. घनदाट जंगल, 2100 फुट उंच आणि धबधबे.... अरे हो हेच तर थ्रील आहे आजच्या ट्रेक चे मस्त ना, कॉम्बो थ्रील पॅकेज अजून काय हवंय. चला, अरे चला मित्रांनो आज तुम्हांला मस्त पैकी घनदाट जंगलाची 'अंधार बन' सफर घडवून आणते. तयार ना मग! कोणाची वाट पाहताय उचला बॅगा निघा. थांबा! लगेच कुठे निघालात... पावसा...