Posts

Showing posts from August, 2024

अंधारबन.... कॉम्बो थ्रील पॅकेज

Image
पावसात मस्त भिजायचे, हिरवेगार डोंगर पालथे घालायचे, धबधब्याखाली चिंब व्हायचे आणि भिजून झाल्यावर टपरीवर गरमागरम 🔥 भजी आणि चहा आहाहः....! असे अनेक अनुभव सर्वांनाच अनुभवायचे असतात. खरं तर हे सगळं अनुभवण्यासाठी सगळे जण अगदी आसुसलेले असतात. आणि हे सगळे अनुभव पावसाळी ट्रेक शिवाय कसे येणार. अशा वेळी खरी धांदल उडते ती आम्हा ट्रेकर्सची गड किल्ले करु की धबधबे पाहू की जंगलात जाऊ, असे एक ना अनेक!                                                चला तर मग आज आपण पावसाळी ट्रेक ला जंगलात जाऊ आणि ते जंगल 2100 फुट उंचावर आणि घनदाट असेल तर...!!! आयू आला ना पोटात गोळा!!!!!!! एवढ्या उंचावर मग हमखास धबधबे. घनदाट जंगल, 2100 फुट उंच आणि धबधबे.... अरे हो हेच तर थ्रील आहे आजच्या ट्रेक चे मस्त ना, कॉम्बो थ्रील पॅकेज अजून काय हवंय. चला, अरे चला मित्रांनो आज तुम्हांला मस्त पैकी घनदाट जंगलाची 'अंधार बन' सफर घडवून आणते. तयार ना मग! कोणाची वाट पाहताय उचला बॅगा निघा. थांबा! लगेच कुठे निघालात... पावसा...

पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती 🚩

Image
 13 व 14 जुलै 2024 ...  जिंकलो तरी इतिहास घडला पाहिजे हरलो तरी इतिहास घडला पाहिजे.... 🚩 🚩   घोडखिंडी ची झाली पावनखिंड ती आषाढ पोर्णिमेची रात्र, पोर्णिमा असूनही किर्रर काळोख कारण गच्च ढगांच्या गर्दीत गडप झालेला चंद्र, दाटून आलेलं आभाळ  आणि कोणत्याही क्षणी पाऊस कोसळेल अशी परिस्थिती, तरीही मिट्ट काळोखात, निसरड्या वाटा, पण कसलीही तमा न बाळगता... भर पावसात चिखलातून बाजी फुलाजी मावळे आणि पालखी च्या दुतर्फा धारकरी अनवाणी धावत होते फक्त धावत होते, आपल्या जिवाची पर्वा न करता त्यांना फक्त विशाळ गड गाठायचा होता. सिद्धी च्या विळख्यातून सुटून... फक्त गड गाठायचा होता, कारण एकच आपला राजा सुखरूप गडावर पोहोचला पाहिजे, लाखाचा पोशिंदा वाचला  पाहिजे! इतकंच त्यांच्या डोक्यात होतं. 🚩 🚩  अशी ही एका थरारक रणसंग्रामाची रात्र.......  शक्ती आणि युक्ती ची अनोखी रणनिती... . कसा घडला असेल शक्ती आणि युक्ती चा अनोखा मिलाफ...हाच तो पन्हाळ गड यालाच पडला होता बलाढ्य सिद्धी चा विळखा, आणि हाच विळखा तोडून महाराजांनी रातोरात विशाल गडाकडे कूच केली होती. इथूनच झाली होती मोहिमेला स...