Posts

Showing posts from 2020

AKV trail trek... 🚩 🚩

Image
  अनलॉक नंतर चा पहिला ट्रेक AKV... आंबी, काळ, वेळवंडी ट्रेल ट्रेक.... 🚩🚩मानगांव(पानशेत) ते हरपुड    पुनश्च हरिओम..... पण बराच बदल, परत एकदा आयुष्याची नव्याने सुरुवात.... अनपेक्षित पणे आलेल्या करोना संकटामुळे एकाच वेळी सगळे जग हदरले. प्रत्येकाचं आयुष्य बदलून तर गेलंच, पण बहुतांश लोकांचा जगण्याचा आणि आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन ही बदलला . तब्बल 8 महिन्याच्या कैद नंतर सह्याद्री ट्रेकर्स फाउंडेशन पुणे यांच्या बरोबरच्या तंगडतोड ट्रेक करायला परत एकदा नव्याने सज्ज झालो. 🚩 8 नोव्हेंबरला पहाटे 3 : 30 ला घर सोडले आणि 4:20 ला हिंग ने कॉर्नर ला STF च्या बस मधे बसलो देखिल, एवढ्या मोठ्या गॅप नंतर आमच्या पाहिल्या वाहिल्या ट्रेक ची सुरवात झाली आणि तेंव्हा कुठे जिवाला चैन पडली. बस मध्ये ही झोप येत नव्हती, काय करणार सह्याद्री आहेच असा ओढ लावणारा... कधी एकदा भेटतोय असे झालेले अगदी लहान मुला सारखी अवस्था यावेळी मी अनुभवली. याच्या सानिध्यात गेलं की अगदी देहभान हरपून जातं आणि मी.... मी अशी उरतच नाही. बसच्या खिडक्या बंद असूनही थंडी जाणवत होती. बस पुण्याहून पानशेत शिरकोली मार्गे मानगा...

छंद सांगण्यात दंग सारे बालमित्र...

Image
आजचा विषय ... आपले छंद [01/04, 10:40 AM] Surekha Pawar: वर्षा.... पुस्तकांची आणि माझी मैत्री ...अगदी जिवाभावाची आहे. मला वाटत पुस्तकांसारखं जीवन समृद्ध करण्याची ताकत क्वचितच दुसऱ्या कोणत्या माध्यमात असेल.......मनोरंजन, ज्ञान, सोबत , परिपक्वता सगळं काही पुस्तक देतात. मला ऐतिहासिक, चरित्रात्मक, रहस्यमय पुस्तक खूप आवडतात..सध्या तर मिळालेल्या वेळेचा उपयोग पुस्तक वाचण्यासाठी पुरेपूर करता येतोय ..ही या ताणातुन relax करणारी फार महत्वाची गोष्ट मला वाटते. Dhiraj..... [01/04, 10:40 AM] Surekha Pawar: Sports, outgoing activities, learning businesses for me!!! This was easy to write 🤪 Vaiju..... [01/04, 10:40 AM] Surekha Pawar: I like to make variety of food  therefore I turned my hobby in to my business.Combination of hobby and business makes perfect life which causes our dream come true of our life And also like to bound my relations and friends with love. Guru.... Bike riding ha maza avdta topic. Adventure mhanun me maza bro. Aamhi motorcycle var barshi te tirupati(AP) la...

कैलास पर्वताची अनुभुती देणारा... नागेश्वर - वासोटा ट्रेक

Image
आयुष्यात एकदा तरी कैलास मान सरोवर यात्रा करण्याची प्रत्येकाची इच्छा असतेच. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी द्यावा लागणारा वेळ...आणि येणारा खर्च. कारण ही यात्रा एका दिवसात होणारी तर नाहीच परंतु वेळे अभावी आणि आपल्या इथ पासुन बरीच दूर असल्याने ही यात्रा इच्छा असूनही बर्‍याच जणांना करता येत नाही. पण अशीच एक यात्रा आपल्या सह्याद्रीत ही पूर्ण करता येऊ शकते. आता तुम्ही म्हणाल कसं शक्य आहे. एका दिवसात कैलास पर्वताची अनुभुती देणारी यात्रा हो तर, शक्य आहे.... मी तुम्हाला आज एका अश्या ठिकाणी घेऊन जाणार आहे की, जिथे बाराही महिने स्वयंभू शिवपिंडीवर सतत थेंब थेंब जलाभिषेक होत असतो आणि ती जागा आहे  साडेतीन हजार फुट उंचीवर असलेल्या डोंगराच्या गुहेत....आहे ना निसर्गाचा अद्भुत चमत्कार तीच ही नागेश्वर गुहा..... वैशिष्ट्य म्हणजे वासोटा ट्रेक मधील नागेश्वर यात्रा एका दिवसात पूर्ण ही करता येऊ शकते. ... असंख्य भाविक महाशिवरात्रीला अनेक तासाचा पायी खडतर प्रवास करून अत्यंत श्रद्धेने या स्वयंभू शिवालयात दर्शनासाठी येतात. आता या ट्रेक बद्दल थोडंसं जाणून घेण्यासाठी भूगोलात शिरूया का...