Posts

Showing posts from 2017

चिल्ड् डुंबा... देवकुंड धबधबा

Image
कातळधरा चा थरार अनुभवल्या नंतर मी अगदी रोमांचित होऊन गेले होते. आता दोन महिने झाले पायाला कसली तंगडतोड  नाही,अशा तंगडतोडीतून दुखणाऱ्या पायांची वेदना खुप छान हवी हवीशी वाटते. कित्येक दिवसात या सह्याद्री चे दर्शन झाले नाही की मनाला अगदी रुखरुख लागते. खुप वेड लावले या डोंगरवाटानी, सह्याद्रीच्या कुशीत का एकदा शिरले की याची ओढ वाढतच जाते. तरीही मनाला, पायाच्या भिंगरीला थोडी आवर घालावी लागते; काय करणार आपल्याला सगळंच करायचं असतं ना! घर जबाबदाऱ्या सण उत्सव इ. असो, माझ्यासाठी तर विक पॉईंट ठरतायत या डोंगरवाटा.     ह्या  सह्याद्रीत लपलेला अजुन एक सुंदर नजराणा , अनोख्या हिरव्या रंगात भासणारे अत्यंत नितळ, कुंडाच्या आकाराचे तळंच जणू असे हे 'देवकुंड', आणि या कुंडात तुफान कोसळणारा जिथे पावसाळ्यात जाण्याचा विचार पण करता येत नाही अशा प्लस व्हॅलीतून खाली येणारा रौद्रभिषण धबधबा.... म्हणजेच "देवकुंड धबधबा"!!!!!!!!!" Natural Water Bathtub of God" आणि त्यात डुंबण्याचा योग आलाच....        5 नोव्हेंबर ला फोना ग्रुप ची बस आम्हा 33 वेड्याना गुंडाळून भिरा कडे निघाल...

तुफानी थरार.... कातळधार धबधबा

Image
नमस्कार दोस्तहो.. मागील अंधार बन सफर कशी वाटली... मस्त 👌 ना! पावसाळ्यातील मुख्य आकर्षन असते ते धबधबे पाहण्याचे धबधब्याखाली मनसोक्त भिजण्याचे. कित्येक उंचावरून फेसाळणारे धबधबे सर्वांचेच लक्ष वेधून घेतात, कितीही दुरवर असले तरी आपल्याला खुणावतात. असे फेसाळणारं पाणी अंगावर घेण्यात एक वेगळीच मजा! असे रौद्र रूप धारण केलेले धबधबे समोरुन पाहतो पण याच धबधब्याच्या मागे जाऊन समोरुन धबधबा कोसळतांना पाहू शकलो तर.. कशी वाटते कल्पना! हॅॅ काहिही... म्हणे मागे जाऊन धबधबा पहायचा, असे बरेच जण म्हणतील, पण निसर्गात असे कितीतरी चमत्कार आहेत त्याची आपण कल्पना ही केलेली नसते. पण त्याच्या कुशीत मनापासून शिरलो की तो ही त्याचे सुंदर मोहक तर कधी कधी गुढ तर कधी भन्नाट नजारे दाखवतो. चला तर मग त्याच्याच कुशीत आणि हरखून जाऊया अशाच एका गुढ तुफानी थरार मधे..... तुफानी थरार तुफानी तडाखा... कातळधार धबधबा कातळधार ट्रेक साठी मी खुप उत्सुक होते, कारण या ट्रेक बद्दल ची मिस्ट्री ऐकुन होते. निसर्गात लपलेला रहस्यमय थरार अनुभवण्याचा योग आमच्या फोना च्या 20 आॅगस्ट 2017 च्या ट्रेक मधे आला. आमची 50 जणांची बस 20 आॅगस्ट ला निगडीतू...

बेलाग सुळका.... कोथाळीगड

Image
निसर्गाचा मनसोक्त आनंद घ्यायचा असेल आणि त्याची वेगवेगळी रूपे अनुभवायची असतील  तर, मान्सून ट्रेक ला पर्याय नाही. आम्हा ट्रेकर्सना मान्सून ट्रेक म्हणजे पर्वणीच! खरं तर वर्षा ऋतुची सुरूवात अनुभवण्यासारखी असते. वातावरणातील बदल आणि सर्वत्र पसरत चाललेली हलकीशी हिरवळ मन प्रसन्न करते. नेहमी प्रमाणे फोना ग्रुपने या वर्षातला पहिला मान्सून ट्रेक 18 जून ला आयोजित केला. त्याप्रमाणे आमचा 40 जनांचा ग्रुप पुण्यातून सकाळी साडेसहा ला लोणावळा-खोपोली मार्गे कर्जत कडे रवाना झाला. साधारण पुणे ते कर्जत दोन तास लागतात. हा किल्ला रायगड जिल्ह्यात येत असुन उंची साधारण 3100 फुट आहे. हा किल्ला गिरी दुर्ग प्रकारात येत असुन भीमाशंकर डोंगर रांगेत आहे. कोथाळीगड हा कर्जत पासून 20 कि. मी. अंतरावर आहे. आम्ही कशेळे मार्गे अंबिवली या गावात उतरलो.  ग्रुप लिडर मंदार सरांनी ट्रेक विषयी सुचना दिल्या व हर हर महादेव च्या गजरात अंबिवली गावातून ट्रेक ला सुरुवात केली. अंबिवली तून गडाकडे जाणारी वाट... आजिबात पाऊस नसल्याने ऊन आणि दमट हवे मुळे सर्वजण घामाघूम झाले. डिहाईडरेशन होऊ नये म्हणून लिंबू सरबत, पाणी, एनर्जी...

मनोरंजक आणि रोमांचक विज्ञान केंद्र व तारांगण

Image
            आपण दैनंदिन जीवनात अनेक कामांत आपल्याही नकळत विज्ञानाचा उपयोग करत असतो.विज्ञानाचा जितका अभ्यास करावा, जेवढे निरिक्षण करावे तेवढे विज्ञान जास्त मनोरंजक वाटू लागते. ज्ञानप्राप्ती व शिक्षण यांचे 'सामान्य ज्ञान व शास्त्रीय दृष्टीकोन' हे अविभाज्य अंग आहेत. मुलांचा हाच शास्त्रीय दृष्टीकोन व्यापक व्हावा हा हेतू मनात ठेवून आम्ही मुलींना मनोरंजक आणि रोमांचक अनुभव देण्यासाठी मुंबई विज्ञान केंद्राला भेट देण्याचे ठरवले आणि त्याप्रमाणे 20 मे 2017 ला आम्ही भेट दिली.             नेहरू विज्ञान केंद्र हे वरळी मुंबई येथे असुन 11 नोव्हेंबर 1985 ला सुरू झाले. मुंबईत प्रवेश केला की ईस्टर्न फ्री वे ने येथे लवकर पोहचू शकतो. हे केंद्र होळी व दिवाळी सोडून पूर्ण वर्ष चालू असते. वेळ 10ते6  असून येथे जेवणासाठी कॅन्टीन व पिण्यासाठी पाणी उपलब्ध आहे. पार्किंग व इतर सुविधा उपलब्ध आहे.या केंद्राच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला कोणार्क च्या सूर्य मंदिर येथे असलेल्या चक्राची प्रतिकृती खुप छान दिसते.         ...