तुफानी थरार.... कातळधार धबधबा
नमस्कार दोस्तहो.. मागील अंधार बन सफर कशी वाटली... मस्त 👌 ना! पावसाळ्यातील मुख्य आकर्षन असते ते धबधबे पाहण्याचे धबधब्याखाली मनसोक्त भिजण्याचे. कित्येक उंचावरून फेसाळणारे धबधबे सर्वांचेच लक्ष वेधून घेतात, कितीही दुरवर असले तरी आपल्याला खुणावतात. असे फेसाळणारं पाणी अंगावर घेण्यात एक वेगळीच मजा! असे रौद्र रूप धारण केलेले धबधबे समोरुन पाहतो पण याच धबधब्याच्या मागे जाऊन समोरुन धबधबा कोसळतांना पाहू शकलो तर.. कशी वाटते कल्पना! हॅॅ काहिही... म्हणे मागे जाऊन धबधबा पहायचा, असे बरेच जण म्हणतील, पण निसर्गात असे कितीतरी चमत्कार आहेत त्याची आपण कल्पना ही केलेली नसते. पण त्याच्या कुशीत मनापासून शिरलो की तो ही त्याचे सुंदर मोहक तर कधी कधी गुढ तर कधी भन्नाट नजारे दाखवतो. चला तर मग त्याच्याच कुशीत आणि हरखून जाऊया अशाच एका गुढ तुफानी थरार मधे..... तुफानी थरार तुफानी तडाखा... कातळधार धबधबा
कातळधार ट्रेक साठी मी खुप उत्सुक होते, कारण या ट्रेक बद्दल ची मिस्ट्री ऐकुन होते. निसर्गात लपलेला रहस्यमय थरार अनुभवण्याचा योग आमच्या फोना च्या 20 आॅगस्ट 2017 च्या ट्रेक मधे आला. आमची 50 जणांची बस 20 आॅगस्ट ला निगडीतून सकाळी 7 वा. तळेगाव देहूरोड जुना बाॅम्बे पुना हायवे वरुन लोणावळा कडे निघाली. लोणावळा पासुन फक्त 7 कि. मी. अंतरावर हा कातळधार धबधबा आहे. बसमधे नाष्टा करून पुढे एके ठिकाणी निशा हॉटेल मध्ये सर्वांनी चहा घेतला, ग्रुप मधिल एका मेंबर्स चा दिक्षित सरांचा वाढदिवस असल्याने केक कट करुन सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि पुढे मार्गस्थ झालो. राजमाची मार्गावर उधेवाडी येथे डाव्या बाजूला एक चहाची टपरी आहे याच ठिकाणी बस लावून आम्ही सर्वजण ट्रेक साठी सज्ज झालो. टिम लिडर मंदार सरांनी ट्रेक विषयी सर्व सुचना दिल्या व त्या पाळण्याचे आदेश ही दिले.
सकाळ पासून पावसाने जोर धरला होता. लोणावळ्यात तर विचारुच नका या राजमाची मार्गावरून चालतांना डाव्या बाजूला असलेली दरी, दरीच्या पलिकडे पसरलेले हिरवेगर्द डोंगरच डोंगर भरुन आलेलं आभाळ, आणि अधुन मधुन अंगावरून जाणारे ढग किती सुखद अनुभव अहाहः!! हे सभोवतालचे वातावरण आणि सुंदर नजारे पाहुन मन कसे उल्हासीत होत होते, म्हणून की काय या व्हॅली ला उल्हास व्हॅली म्हणत असावेत अशी ही सुंदर अप्रतिम उल्हास व्हॅली आणि या व्हॅलीतून वाहणाऱ्या नदीला उल्हास नदी असे म्हणतात.
उल्हास व्हॅली
साधारण 1कि.मी. चालल्या नंतर डाव्या बाजूला एका ठिकाणा पासून उल्हास व्हॅलीत जंगल उतारावर ची वाट सुरु होते. इथे परत एकदा टिम लिडर्स राणे सर व मंदार सरांनी सुचना दिल्या व काऊन्ट घेतला. या जंगलात बांबू वायपर जातीचे अत्यंत विषारी साप आहेत. आणि ते झाडांवर गुंडाळून बसलेले असतात व हिरव्या रंगामुळे ते लवकर दिसतही नाहीत, त्यामुळे कोणत्याही झाडाला हात लावू नये. या व्हॅलीत उतरणारी वाट जंगलातून सुरु होते पावसामुळे वाट चिखलमय व अत्यंत निसरडी झाल्याने व झाडांचा अधार घेता येत नसल्याने पावले काळजीपूर्वक टाकावी लागतात. इथल्या वाटा म्हणजे भुलभुलैया आहे एकदा का वाट चुकली की माणूस भरकटतो आणि इथेच जंगलात अडकतो व बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही. काही वाटा तर थेट व्हॅलीत जातात. मागे इथे काही लोक भरकटलेली आहेत. म्हणून या ट्रेक ला वैयक्तिक जाऊ नये प्रॉपर ट्रेकिंग ग्रुप बरोबर जावे. 30 मि. नंतर जंगल वाट संपते व समोर हिरवेगार विस्तीर्ण पठार दिसते.
इथेही दोन मोठे ओहळ पार करुन परत जंगलाची वाट सुरु. आता ही वाट मोठ मोठ्या झाडांतून न जाता खांद्यापर्यंन्त वाढलेल्या गवतातून जाऊ लागली. आणि खरंच इथे अनेक वाटा दिसु लागल्या आम्ही मात्र आमच्या लिडर च्या मागे मागे ती घसरडी वाट सावकाश उतरत होतो. साधारण 45 मि. नी एक मोठा धबधबा लागतो. इथेही बर्याच जणांनी भिजण्याचा आनंद घेतला व धबधबा क्रॉस करून सर्वजण पुढे निघालो.
आता घनदाट जंगल सुरू झाले हे ही जंगल अंधार बन सारखेच घनदाट आहे, पण या जंगलातील वाटा अंत्यंत फसव्या आहेत त्यामुळे कोणीही ग्रुप सोडून चालू नये. मार्ग कळण्यासाठी अधिच्या ट्रेकर्स ने ठिकठिकाणी एकावर एक रचलेले तीन दगड दिसतात, तसेच झाडांना आॅरेंन्ज कलरच्या पट्ट्या ही बांधलेल्या आहेत. अशा ह्या किर्र जंगलातून अंगावर पाऊस झेलत पुढे निघालो.
आता कोसळणाऱ्या धबधब्याचा आवाज येऊ लागला, जस जसे पुढे जाऊ तसतसा आवाज वाढू लागला आणि जो धबधबा पाहण्यासाठी आम्ही आतुर होतो तो सह्याद्रीच्या कुशीत लपलेला नजराणा आता आमच्या समोर अगदी कडेलोट होऊन मनसोक्त बेभान होऊन कोसळत होता. हाच तो "कातळधार धबधबा".एक भव्य कातळ आणि त्यावरुन कोसळणारा धबधबा प्रत्येकजण हा नजराणा कॅमेरात टिपत होता. इथेही वाट फार अरुंद घसरडी असल्याने घाई गडबड न करता एक एक जण ह्या नजराण्याचा आनंद घेत होते. इथून थोडे पुढे उजव्या बाजूने एक कठीण चिखलमय घसरडा पॅच आहे, हा पॅच चढून गेल्यावर व थोडं अंतर चालून गेल्यावर समोर अख्खा कातळधार तुफान कोसळताना दिसला. माझ्या तर अंगावर रोमांच उभे राहिले. अप्रतिम नेत्राचे सार्थक झाले आज..!!
पावसाच्या धारा अंगावर घेत तिथे असलेल्या गुहेत थांबण्याचा व इथेच जेवण करण्याचा निर्णय घेतला गुहेत पुरेशी जागा नसल्याने काही आत तर काही बाहेर उभे राहून जेवले. आता खरी ओढ लागली ती रहस्यमय गुहा पाहण्याची. लिडर ने सांगितले की, पावसाचा जोर जास्त आहे आधी आम्ही गुहेकडे जाऊन बघतो व योग्य वाटले तरच निवडक ट्रेकर्सना घेऊन जाऊ. त्यामुळे आम्ही लिडर ची वाट पाहत थांबलो.
छोटी गुहा
आता शेवटचा अंत्यंत कठीण टप्पा खोल दरीत उतरुन त्या गुढ गुहेत जाण्याचा. पाऊस चालूच होता, खाली दरीत उतरणारी वाट घसरडी होती. वाटेत मोठ मोठे दगड पण त्यावरही शेवाळ वाढल्याने हात चांगलेच सटकत. इथे प्रत्येक जण सावकाश उतरत होता. एकीकडे वार्याचा प्रचंड मारा त्यामुळे थंडी वाजू लागली व थंडीमुळे पाय लटपटु लागले. आणि त्यात कोसळणाऱ्या धबधब्याचा भयानक आवाज. जिथे धबधबा कोसळत होता तेथून परत उलट्या दिशेला पाणी तुफानी उसळत होते. कोसळून उसळलेल्या पाण्याचे तडाखे चांगलेच अंगावर बसत होते. हे उसळलेले पाण्याचे तुषार वार्याच्या जोरामुळे थेट राजमाची वर जात होते. इथून राजमाची अतिशय सुंदर दिसत होता. अर्ध्या टप्प्यानंतर लिडरने एका मोठ्या दगडाला रोप बांधून तो थेट गुहे पर्यंत नेला होता.
या ठिकाणी एका मेंबर ला चक्कर आली. बराच वेळा अशा ठिकाणी श्वास कोंडल्या सारखे होते, अशा वेळी बसुन रहावे व स्थिर वाटले की परत फिरावे. मी ही हा तुफानी तडाखा अंगावर घेत मधे मधे थांबुन मान उंच करुन पूर्ण धबधबा पाहण्याचा प्रयत्न करित होते पण काही सेकंदच . वार्याचा जोर इतका होता की एका प्रयत्नात धबधबा पाहु शकत नव्हते. ते रौद्ररूप डोळ्यात साठवून घेण्याचा प्रयत्न करीत होते पण डोळे विस्फारले जात. असा हा तुफानी थरार मी अनुभवत होते. आता थोडेच अंतर की गुहेत प्रवेश पण ग्रुप लिडर मंदार सरांनी इशारा केला की मागे फिरा पाण्याचा प्रचंड जोर वाढला आहे, खुप वाईट वाटले निसर्गा पुढे आपण काही करू शकत नाही. आमच्या आधी पुढे गेलेले 10 ते 12 मेंबर्स गुहेत जाऊ शकले.
गुढ गुहा
इतक्या जवळ जाऊन परत मागे फिरावे लागल्याने खुप वाईट वाटत होतं. जड पावलांनी माघार घेतली व मनाला दिलासा दिला... नेक्स्ट टाईम, चलो कोई बात नही! दरीत खाली उतरुन आलेला कठीण पॅच परत वर चढू लागलो. वर असलेल्या छोट्या गुहे जवळ बाकीच्या मेंबर्स ची वाट पहात थांबलो. सर्व मेंबर्स परत आल्यावर कातळधरा ला निरोप देत आम्ही माघारी निघालो. तिच चिखलमय घसरण उतरुन त्या घनदाट जंगलातून परत निघालो. इथे वाटा फसवणूक करतात वाटा नेमक्या वेळी चकवतात इथेच आमच्यातील 15 जण वाट चुकले पण लिडर राणे संराच्या वेळीच लक्षात आल्याने सर्वांना आवाज देऊन माघारी बोलवण्यात आले. वाटेत असलेल्या छोट्या धबधब्याखाली सर्वजण मनसोक्त भिजण्याचा आनंद घेत होते. इथेच ग्रुप फोटोही घेतले. माझे ट्रेकिंग मित्र आनंद राज व विवेकानंद यानी उत्तम फोटोग्राफी केली. या ट्रेक च्या खतरनाक ठिकाणी जबरदस्त विडिओ शुट करणारे आमचे सहकारी प्रशांत गुंड सरांचे विशेष कौतुक 👏 👏 फ्रेंड्स आॅफ नेचर असोसिएशन ट्रेकिंग ग्रुप चे लिडर्स मनोज राणे, मंदार थरवल, रोहित सर यांनी साहसी कौशल्य पणाला लावून सर्वांना हा कातळधार तुफानी जबरदस्त ट्रेक घडवला यासाठी सर्वांचे मनापासून आभार व आलेल्या सर्व नव्या जुन्या मेंबर्सचे कौतुक व अभिनंदन.
ट्रेक स्टार्ट... 10 am.
ट्रेक पूर्ण..... 5 pm.
ट्रेक साठी आवश्यक गोष्टी...
*वॉटर प्रुफ सॅक
* ग्रीपवाले स्पोर्ट्स शुज
*फुल ट्रेक पॅन्ट, फुल टि शर्ट
*रेनकोट जादा कपडे, टॉवेल
*1 लिटर पाणी, टिफीन
*मोबाईल प्लास्टिक कव्हर
*घेतलेल्या सर्व गोष्टी प्लास्टिक बॅग मधे घेणे
*जादा प्लास्टिक बॅग
*स्विमिंग कॅप

Tufani Blog, I missed this thrilling.....
ReplyDeleteKhup Chan blog. Keep writing
ReplyDeleteVachtana Kataldhar chi bhatkanti zali aani pavsat bhijlyasarakhe vatale...maja aali ☺
ReplyDeleteसुरेखा छानच तुझा हा अनुभव तसा चित्तथरारक असाच आहे . पण काही हरकत नाही . छान लिहायला लागलीस. असाच निसर्गाचा अनुभव आनंद घेत जगत रहा . खूप खूप शुभेच्छा . .
ReplyDeleteNice blog...
ReplyDelete