मनोरंजक आणि रोमांचक विज्ञान केंद्र व तारांगण
आपण दैनंदिन जीवनात अनेक कामांत आपल्याही नकळत विज्ञानाचा उपयोग करत असतो.विज्ञानाचा जितका अभ्यास करावा, जेवढे निरिक्षण करावे तेवढे विज्ञान जास्त मनोरंजक वाटू लागते. ज्ञानप्राप्ती व शिक्षण यांचे 'सामान्य ज्ञान व शास्त्रीय दृष्टीकोन' हे अविभाज्य अंग आहेत. मुलांचा हाच शास्त्रीय दृष्टीकोन व्यापक व्हावा हा हेतू मनात ठेवून आम्ही मुलींना मनोरंजक आणि रोमांचक अनुभव देण्यासाठी मुंबई विज्ञान केंद्राला भेट देण्याचे ठरवले आणि त्याप्रमाणे 20 मे 2017 ला आम्ही भेट दिली.
नेहरू विज्ञान केंद्र हे वरळी मुंबई येथे असुन 11 नोव्हेंबर 1985 ला सुरू झाले. मुंबईत प्रवेश केला की ईस्टर्न फ्री वे ने येथे लवकर पोहचू शकतो. हे केंद्र होळी व दिवाळी सोडून पूर्ण वर्ष चालू असते. वेळ 10ते6 असून येथे जेवणासाठी कॅन्टीन व पिण्यासाठी पाणी उपलब्ध आहे. पार्किंग व इतर सुविधा उपलब्ध आहे.या केंद्राच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला कोणार्क च्या सूर्य मंदिर येथे असलेल्या चक्राची प्रतिकृती खुप छान दिसते.
सुसज्ज आणि प्रशस्त असे हे विज्ञान केंद्र, इथे ऊर्जा ध्वनी, गतिज ऊर्जा, दाब, बल, यांत्रिकी, परिवहन इ. वर अधारित प्रयोग तसेच फोटो गॅलरी, 360 अभासी गॅलरी टूर आणि मुव्ही शो आणि विविध गोष्टी पाहता येतील. मुलांसाठी गेम, खेळणी, पुस्तके यांची विक्री चालू असते. आपल्याला तर कधी मुलांना कोणत्या ना कोणत्या घटनांबद्दल पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे ही इथे मिळतील. रंगीत मॉडेल,
प्रयोग व त्यांचे स्पष्टीकरण मराठी व इंग्रजी मध्ये दिलेले आहे.
आपण जस जसे एक एक प्रयोग पाहत निरिक्षण करत पुढे जाऊ तस तसे अनेक कोड्यांचा उलगडा होत जातो, आणि विज्ञान अधिक मनोरंजक वाटू लागते. तसेच विज्ञानाच्या विविध संकल्पना इथे स्पष्ट होतात. आभासी गॅलरी तर एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जाते, ही गॅलरी व्यवस्थित पहा आणि मजा घ्या. इमीटेटींग स्केलेटन चा थ्रील ही पाहण्या सारखा आहे पहा अनुभवा,आणि मुलांच्या चेहर्यावरिल चमत्कारिक भाव पहा.
येथे एकूण चार मुव्ही शो आहेत,
*सायन्स अॅन्ड स्फीएर,
*विज्ञान ओडिसी फिल्म- अलास्का-स्पीरीट आॅफ वर्ल्ड,
*3डी विज्ञान शो,
*ह्युमन बॉडी 15मि.चा अॅनिमेटेड शो.
हे सर्व शो हिंदी, मराठी, इंग्रजी मधून उपलब्ध आहेत. हे चारही शो मुलांना जरुर दाखवा. मुलांना येथील विविध प्रयोग पाहून स्वतः प्रयोग करून पाहण्याची प्रेरणा मिळेल. मुव्ही शो पाहून येणारे मनोरंजनानी युक्त असे रोमांचकारी अनुभव मुलांना घेऊ द्या. या विज्ञान केंद्राच्या भेटीतून मुलांचा शास्त्रीय दृष्टीकोन व्यापक होईल आणि ते शास्त्रीय दृष्टीकोनातून स्वतंत्रपणे विचार करण्यास नक्कीच शिकतील यात शंकाच नाही!!!!!
अशा प्रकारे हसत खेळत नविन गोष्टी शिकत मुलींची विज्ञान केंद्राची भेट खुप छान झाली. आणि पुढे तारांगण साठी निघालो.
नेहरू तारांगण...........
आता उत्सुकता वाढली होती ती तारांगणाची आणि तिथे गेल्यावर ग्रह चंद्र तारे कसे दिसतील, आपण त्यांना दिवसा कसे पाहु शकतो हे जाणून घेण्याची. विज्ञान केंद्रातून बाहेर पडून आम्ही नेहरू तारांगण कडे निघालो.
तारांगणा चा तो घुमटाकार आमचं लक्ष वेधून घेत होता. याच्यात आपल्याला एक वेगळेच विश्व अनुभवायला मिळणार आहे हे सांगितल्यामुळे मुली तर खूप खुश होत्या. दि. 3मार्च 1977 रोजी नेहरू तारांगण सुरू झाले. इथे मंगळवार ते रविवार दररोज चार शो हिंदी, मराठी, इंग्रजी भाषेतून सादर केले जातात.तारांगणाच्या आत प्रवेश केल्यावर सर्व प्रथम आपली सूर्यमाला दिसते.
तिथे असलेला प्रतिनिधी आपल्या सुर्य मालेची लेझर द्वारे माहिती देत होते. सुर्या भोवती फिरणारे ग्रह व त्यांच्या भोवती फिरणारे उपग्रह बघत बघत आणि माहिती ऐकत ऐकत प्रत्येक जण या ग्रह ताऱ्यांच्या दुनियेत प्रवेश करत होते.त्याची माहिती ऐकून झाल्यानंतर आम्ही तिथे असलेली माहिती फोटो पाहु लागलो. तसेच डाव्या बाजूला काही देशांच्या वेळा दाखवणारी घड्याळे ही दिसतात, आणखी पुढे गेल्यावर मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावरील दृश्या ची प्रतिमा,चंद्र पृष्ठ भागाचा देखावा व चंद्रा वरून दिसणारा निळसर ग्रह पृथ्वी,
आणि वेगवेगळ्या ग्रहावर आपले वजन किती असेल हे दाखवणारे वजनकाटे आहेत.
सध्या 'डीजीस्टार - 3' हे नवे तंत्रज्ञान वापरले जाते. या आधी 'कार्ल झाइस' हा प्रोजेक्टर वापरत असत. त्याद्वारे अवकाशातील विविध घडामोडींचे घटनांचे दर्शन आम्हाला या घुमटाकारात दाखवले जाते. बसण्याचे आसन म्हणजे खुर्च्यां ची रचनाच अशी केली आहे जसं काही आपण खुल्या अंगणात आकाशाखाली झोपल्याचा आभास निर्माण होतो आणि अश्या हटके अनुभवांची ओढ वाढतच जाते.
असे हे आभासी कृत्रिम अवकाश पाहताना सर्वजण अगदी हरवून जातात. इथे आम्हाला राशी, नक्षत्र, तारकापुंज, आपली दीर्घिका देवयानी या बद्दल माहिती सांगितली. तसेच आपण जागा बदल्यानंतर आकाशात असणाऱ्या धृव तार्यात कसा फरक पडतो उदा. मुंबई तून पाहत असलेले आकाश आणि काही दिवसांनी पुन्हा जम्मू तून पाहत असलेले आकाश या दोन्ही ठिकाणा वरून धृव तार्याचे स्थान वेग वेगळे भासते. या घटनेचा अभ्यास तारांगणा मुळे करता येतो आणि या मुळे आपल्या त अधिच असलेली जिज्ञासा जागृत करतो. एका ठिकाणी असलेली अंतराळ विराची प्रतिकृती. इथेही फोटो काढण्याचा मोह झाला.
असे हे मनोरंजक आणि रोमांचक विज्ञान केंद्र व तारांगण पहायला कधी येताय, तर मग नक्की या दुनियेत हरवून जाल.
V Good, Photos also nice
ReplyDeleteधन्यावाद सर
DeleteNice one. Keep it up! 👍
ReplyDeleteधन्यावाद सर
DeleteVery welll...
ReplyDelete