कैलास पर्वताची अनुभुती देणारा... नागेश्वर - वासोटा ट्रेक
आयुष्यात एकदा तरी कैलास मान सरोवर यात्रा करण्याची प्रत्येकाची इच्छा असतेच. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी द्यावा लागणारा वेळ...आणि येणारा खर्च. कारण ही यात्रा एका दिवसात होणारी तर नाहीच परंतु वेळे अभावी आणि आपल्या इथ पासुन बरीच दूर असल्याने ही यात्रा इच्छा असूनही बर्याच जणांना करता येत नाही. पण अशीच एक यात्रा आपल्या सह्याद्रीत ही पूर्ण करता येऊ शकते. आता तुम्ही म्हणाल कसं शक्य आहे. एका दिवसात कैलास पर्वताची अनुभुती देणारी यात्रा हो तर, शक्य आहे.... मी तुम्हाला आज एका अश्या ठिकाणी घेऊन जाणार आहे की, जिथे बाराही महिने स्वयंभू शिवपिंडीवर सतत थेंब थेंब जलाभिषेक होत असतो आणि ती जागा आहे साडेतीन हजार फुट उंचीवर असलेल्या डोंगराच्या गुहेत....आहे ना निसर्गाचा अद्भुत चमत्कार तीच ही नागेश्वर गुहा..... वैशिष्ट्य म्हणजे वासोटा ट्रेक मधील नागेश्वर यात्रा एका दिवसात पूर्ण ही करता येऊ शकते. ... असंख्य भाविक महाशिवरात्रीला अनेक तासाचा पायी खडतर प्रवास करून अत्यंत श्रद्धेने या स्वयंभू शिवालयात दर्शनासाठी येतात. आता या ट्रेक बद्दल थोडंसं जाणून घेण्यासाठी भूगोलात शिरूया का...