Posts

मधुर अठवणींचा मधाळ ट्रेक... मधुमकरंद गड

Image
      मधु मकरंद गड नावा प्रमाणेच कसा मधाळ वाटतो ना! नावातच किती ओढ वाटते 'मधु मकरंद' गड. या वनदूर्गा ची वाट जावळी च्या घनगर्द आरण्यातून जाते. म्हणून मला हा ट्रेक करायचा होता. अशी ही जावळी.... जावळी म्हणजे वाघाची जाळी, येता जावळी जाता गोवळी... अशी ही मोऱ्यांची जावळी.  जावळीचं खोरं जितकं आफ़ाट तितकंच अवघड व अभेद्य आहे. अशी ही अभेद्य जावळी प्रत्यक्षात ताब्यात घेण्याची कोणाची हिम्मत देखील होत नव्हती. असं हे जावळीचं अभेद्य खोरं शिवरायांनी मोऱ्यांचा बिमोड करुन स्वराज्यात आणलं आणि जावळी जिंकून स्वराज्य विस्तार केला. अशी ही जावळी लहान पणा पासून वाचनात आलेली,गोष्टीतून ऐकण्यात आलेली. तेव्हा पासून नेहमी वाटायचं एकदा तरी पहावी. आणि तो योग आलाच... या घनगर्द अरण्यातला वनदूर्ग पाहण्याची व निबिड जंगलातून वाटचाल करण्याची मनातील इच्छा.... "माऊंटन एज अॅडव्हेंचर पुणे"..... यांच्या मधु मकरंद ट्रेक मुळे पूर्ण झाली.       माऊंटन एज अॅडव्हेंचर चा..... 84 वा ट्रेक 'मधु मकरंद गड'... 14 व 15 एप्रिल रोजी ठरला. त्याप्रमाणे 14 एप्रिल रोजी रात्री 11 :30 ला... निगडीतून एक बस व दु...

भन्नाट.... के टू एस

Image
         अर्ध जग निद्रेच्या अधिन असताना, आम्ही काही सर्किट लोक लाखो ताऱ्यांच्या सानिध्यात डोंगरच डोंगर तुडवायला निघालो.....!!!!!!!       कात्रज ते सिंहगड... कठिण समजला जाणारा ट्रेक, आणि ट्रेक विश्वात सर्वांना परिचित असलेला. पुण्यापासून अगदी जवळ. बर्‍याच  डोंगर टेकड्या व घसाराच घसारा, आणि या उतारावर सतत असलेले बॉल बेरींग म्हणजेच मातीतून निसटलेले छोटे मोठे मुरबाड दगड, यावरून उतरणे म्हणजे दिव्यच.. एकुण 17 टेकड्या, 15 ते 16 किमी अंतर... उतारावर करावी लागणारी कसरत व परत परत दमवणारी चढण,आणि वाटेवर कुठेही गांव वस्ती नसल्याने निर्जन टेकड्या दमलो तर कुठे थांबायची सोय नसल्याने के टू एस कठीण तितकाच अव्हनात्मक..!!! मी गेल्यावर्षी केटूएस केला तेव्हाच मनोमन ठरवून टाकलं, परत कधीही इतका कठिण ट्रेक करणार नाही बाबा...! पण विस्मरणाची देणगी आघाध... ही मानवावर निसर्गाने केलेली कृपाच म्हणा ना... हळूहळू दिवस संपले वर्ष संपलं वर्षभरात बरेच ट्रेकही केले. झालं केटूएस चा थरार विस्मरणात जातोय न जातोय तोच पुढच्या केटूएस ट्रेक चा मेसेज ग्रुपवर येऊन धडकला, 'जे फ...

वेड लावणारा... हरिहरगड...

Image
हा छंद जिवाला लावी पिसे... तसचं काहीसं झालय माझं, ट्रेकिंग जिवाला करी वेडेपिसे..... ट्रेक म्हणजे माझ्यासाठी निसर्गातली स्वच्छंद भटकंती. सच ही हैं 'इन पहाड़ों की हवांओं में इक नशा सा हैं'..  और वो बढता ही जा रहा हैं. एक दोन अठवडे सरले की याची ओढ उफाळून वर येतेच येते आणि सुरु होतात पुढच्या ट्रेक चे प्लान. नविन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात तीन ट्रेक झाले माझ्यासाठी मेजवानीच होती. इच्छा तर असते प्रत्येक अठवड्याला ट्रेक करण्याची पण नेहमी जमेलच असे नाही. निसर्गाशी  एकरुप होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ट्रेकिंग, आपण निसर्गाशी बिनधास्त एकरुप व्हायचं. सह्याद्रीतील डोंगर दऱ्यात फिरतांना माझ्या डोळ्यात भरतात ते प्रचंड मोठे राॅक पाषाण, काय एक एक रॉक असतात राव या अशा राॅक च्या प्रेमातच पडलीय मी, तुम्ही म्हणाल काय वेड लागलंय या बाईला... पण खरंच वेडंच लावलं आहे ह्या सह्याद्रीतील काळकभिन्न पाषाणानी त्यांच्यातला एक से एक वेगळेपणा सतत मला भारावून टाकतो. तो म्हणजे, बेलाग सुळक्या मधील 'रुबाब', आणि प्रचंड  कातळातील दिमाखदारपणा तर खुप भावतो. विविध कातळ, काळकभिन्न रंगाचे, मोहक आकारांचे असे...