एक सुंदर घाटवाट.... रतनगड ते हरीशचंद्रगड
26 जानेवारी 2020.... दुसरा दिवस ..... अलार्म वाजला तशी जाग आली. पहाटे चे 5 वाजलेले एकदम मस्त वाटले कालची 22km ची तंगडतोड कुठल्या कुठे गायब झाली बहुदा या गोधडीची कमाल असावी. शहराच्या झगमगाटा पासून खूप खूप दूरवर डोंगराच्या कुशीत वसलेल्या गावातल्या एका कौलारू घरात पथारी पसरायला मिळणे म्हणजे भाग्यच. सकाळी सगळे जण तास दीड तासात फ्रेश झाले. तोपर्यंत STF टीमने सर्वांसाठी मस्त आल्याचा वाफाळता चहा तयारच ठेवला होता. उपमा बनवणे चालू होते. जो तो आपापल्या परीने हातभार लावत होते. मग सर्वांनी नाश्ता करून भराभर आवराआवर करून एका नव्या जोश मध्ये Harichandra साठी तयार झाले. 26 जानेवारी असल्याने सकाळच्या त्या उत्साही वातावरणात सर्वांनी राष्ट्रगीत म्हणुन प्रजासत्ताक दीन साजरा केला. ज्यांच्या कडे रात्री आम्ही मुक्काम केला होता त्यांचे आम्हा सर्व ट्रेकर्स च्या वतीने दुगड सरांनी आभार मानले आणि इथेच सर्वाना आजच्या ट्रेक बद्दल माहिती दिली व सकाळी 8 वाजता कुमशेत गावातून ट्रेक सुरु झाला. कालचा अनमोल रतन गड, ती दिमाखदार खिंड व एक सुंदर घाटवाट मागे टाकून Harichandra च्या ओढीने पाऊले झपाझप पडू ला...