Posts

ढवळे ते आर्थर सीट ट्रेक.... 🚩

Image
जावळी च्या खोर्‍यातील एक हटके घाट वाट ..   ढवळे ते आर्थर सीट ट्रेक 🚩 9 फेब्रुवारी 2020 आठ तासाच्या पायपीट नंतर खालून एक नजर वर आर्थर सीट कडे टाकली, तर ही माणसांची गर्दी त्या गर्दीला पाहून त्यांची थोडी कीव आली. मानत आले 'अरे बाबानो इथून जो नजरा बघताय त्याच्या कितीतरी पट मोहक सौंदर्य, खरं वैभव तर या जावळी च्या खोर्‍यात दडलेलं आहे' आणि ते तुमच्या समोर हाथ पसरून उभं आहे रे... आता काही मिनिटातच मी आर्थर सीट वर आणि याच्यावरून कित्येकदा पाहिलेला नजारा आज परत एकदा पाहताना अगदी  कृत्य कृत्य झाले होते. या  पॉईंट वरून दिसणारा मोहक नजारा जर आर्थर ला वेड लावत असेल तर विचार करा, इथपर्यंत घेऊन येणार्‍या दर्‍याखोर्‍यातल्या घनदाट अरण्यातील सुंदर अश्या घाटवाटा आपल्याला अनुभवायला मिळाल्या तर किती वेडं करतील हो ना...! आपल्या महाराष्ट्राला लाभलेलं गौरवस्थान म्हणजे आपला सह्याद्री, याचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. राकट रांगडा कणखर दिमाखदार असा हा सह्याद्री म्हणजेच आपला पाश्चिम घाट, देशावरून (घाटावरून) कोकणात उतरणार्‍या आणि कोकणातून देशावर जाणार्‍या वाटा म्हणज...

एक सुंदर घाटवाट.... रतनगड ते हरीशचंद्रगड

Image
26 जानेवारी 2020.... दुसरा दिवस ..... अलार्म वाजला तशी जाग आली. पहाटे चे 5 वाजलेले एकदम मस्त वाटले कालची 22km ची तंगडतोड कुठल्या कुठे गायब झाली बहुदा या गोधडीची कमाल असावी. शहराच्या झगमगाटा पासून खूप खूप दूरवर डोंगराच्या कुशीत वसलेल्या गावातल्या एका कौलारू घरात पथारी पसरायला मिळणे म्हणजे भाग्यच. सकाळी सगळे जण तास दीड तासात फ्रेश झाले. तोपर्यंत STF टीमने सर्वांसाठी मस्त आल्याचा वाफाळता चहा तयारच ठेवला होता. उपमा बनवणे चालू होते. जो तो आपापल्या परीने हातभार लावत होते. मग सर्वांनी नाश्ता करून भराभर आवराआवर करून एका नव्या जोश मध्ये Harichandra साठी तयार झाले.  26 जानेवारी असल्याने सकाळच्या त्या उत्साही वातावरणात सर्वांनी राष्ट्रगीत म्हणुन प्रजासत्ताक दीन साजरा केला. ज्यांच्या कडे रात्री आम्ही मुक्काम केला होता त्यांचे आम्हा सर्व ट्रेकर्स च्या वतीने दुगड सरांनी आभार मानले आणि इथेच सर्वाना आजच्या ट्रेक बद्दल माहिती दिली व सकाळी 8 वाजता कुमशेत गावातून ट्रेक सुरु झाला. कालचा अनमोल रतन गड, ती दिमाखदार खिंड व एक सुंदर घाटवाट मागे टाकून Harichandra च्या ओढीने पाऊले झपाझप पडू ला...